नवरात्रीतील गरब्याचे विविध रंग; कुठे डोळ्यावर पट्टी तर कुठे तलवार हाती, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 17:39 IST2019-10-07T17:36:20+5:302019-10-07T17:39:23+5:30

दरवर्षीप्रमाणे गरब्याचे विविध रंग नवरात्रीत पाहायला मिळतात. यावर्षीही गरब्याचा जोश पाहायला मिळाला.
गुजरातच्या भरुच येथे तलवार हातात पकडून गरबा खेळला जातो. याठिकाणी पुरुषांसोबत महिलाही तलवार हातात घेऊन गरबा खेळताना दिसतात.
अहमदाबादमध्ये गरब्याची परंपरेसोबत आधुनिकतेची जोड पाहायला मिळते. ज्याठिकाणी गरबा नृत्यासोबत लोकांची कला सादर करण्याची संधी मिळते. काहीजण आपल्या डोक्यावर भांड्यांचे कळस घेऊन गरबा खेळतात.
काही तरुण मंडळी डोळ्यावर पट्टी बांधून गरबा खेळताना दिसतात.
काही महिला तर दोन-तीन कळस डोक्यावर ठेऊन गरबा खेळतात.