अबब! तळघरात जोडप्याला सापडला खजिना; सूटकेस उघडताच डोळे दिपले, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 08:01 PM2022-02-10T20:01:59+5:302022-02-10T20:06:12+5:30

आपल्यापैकी अनेकांचं स्वप्न असतं की, त्यांच्याकडे खूप सारे पैसे हवेत. जर विचार करा काही क्षणात तुमचं हे स्वप्न पूर्ण झालं तर तुम्हाला काय वाटेल? तुम्हाला भलेही हा विचार करणंही स्वप्नासारखं वाटत असेल परंतु एका कपल्ससोबत असाच काहीचा किस्सा घडला आहे.

हे कपल्स काही क्षणात मालामाल झाले. राहत्या घरात बसल्या ठिकाणी या कपल्सचं नशीब चमकलं आहे. नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल. ही घटना अमेरिकेच्या क्वीवलेंड ओहिया येथील आहे.

याठिकाणी राहणाऱ्या पती-पत्तीनं आपल्या घरातील तळघराचं नुतनीकरण करत होते. त्यावेळी हे जोडपं तळघरातील साफसफाई करत होते. तेव्हा त्यांना तळघराच्या वरच्या बाजूला असलेल्या एका लाकडी पटलात काहीतरी लपलेले दिसले.

या लाकडाच्या पेटीत हिरव्या आणि तपकिरी रंगाचे दोन सुटकेस सापडले. सुरुवातीला त्याला वाटले की, सुटकेसमध्ये स्पोर्ट्स कार्ड किंवा इतर काही जुन्या गोष्टी असतील. त्यांनी सुटकेस काढली आणि पत्नीला बोलावले. ही सुटकेस त्यांना जड वाटली नाही, त्यामुळे त्यांना काहीही अंदाज आला नाही.

जेव्हा या दोन्ही सूटकेस उघडून पाहिल्या तेव्हा त्यांना स्वत:च्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. सूटकेसमध्ये कागदात रॅप केलेले तीन पॅकेज होते. त्याचसोबत या सूटकेसमध्ये एका जुन्या वृत्तपत्राचं कात्रण मिळालं जे २५ मार्च १९५१ सालचं होतं.

पहिली सूटकेस उघडली तेव्हा व्यक्तीनं आणि त्यांच्या पत्नीला एकूण २३ हजार डॉलर म्हणजे १७ लाख २४ हजार १३७ रुपये आढळले. जेव्हा दाम्पत्याने दुसरं सूटकेस उघडलं तेव्हा त्यांचे डोळेच दिपले. पहिल्या पेक्षा दुसऱ्या सूटकेसमध्ये जास्त कॅश होती. या सूटकेसमध्ये ४५ हजार डॉलर म्हणजे ३३ लाख ७३ हजार १५५ रुपये रक्कम होती.