Coronavirus : हात धुण्याची मोहिम सर्वातआधी सुरू करणारा डॉक्टर कोण माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 10:31 AM2020-04-19T10:31:31+5:302020-04-19T10:51:55+5:30

19व्या शतकात हंगरीमधील डॉ. इग्नाज सेमेल्विस यांनी हात धुण्याचे फायदे शोधले आणि संक्रमणाने नेहमी होणाऱ्या मृत्यूंना रोखण्यात यश मिळवलं.

डॉक्टरांनी कोरोना व्हायरससोबत लढण्यासाठी हातांच्या स्वच्छतेला सर्वात महत्वाचं मानलं आहे. पण हातांच्या स्वच्छतेबाबत याआधीही सांगितलं जात होतं. पण त्याकडे फार लक्ष कुणी देत नव्हतं. अशात आता ही चर्चा होऊ लागली आहे की, मेडिकल सायन्समध्ये सर्वातआधी हातांच्या स्वच्छतेबाबत मोहिम कुणी चालवली होती? चला जाणून घेऊ त्या व्यक्तीबाबत....

हात 20 ते 40 सेकंदांपर्यंत धुवून बॅक्टेरिया आणि व्हायरसला शरीरात जाण्यापासून रोखलं जाऊ शकतं. 19व्या शतकात ही बाब कुणालाही माहीत नव्हती. ही बाब जगाला सांगणाऱ्या डॉक्टरांचं नाव आहे डॉ. इग्नाज सेमेल्विस. त्यांची हात धुण्याचं महत्व जगाला सर्वातआधी सांगितलं.

19व्या शतकात हंगरीमधील डॉ. इग्नाज सेमेल्विस यांनी हात धुण्याचे फायदे शोधले आणि संक्रमणाने नेहमी होणाऱ्या मृत्यूंना रोखण्यात यश मिळवलं.

कशी सुरू झाली प्रथा? - 19 व्या शतकात एक अशी वेळ आली होती की, अज्ञात आजारांनी जीव जाणाऱ्यांची संख्या मोठी वाढली होती. त्यावेळी हात धुण्याची प्रथा माहीत नव्हती.

डॉ. इग्नाज सेमेल्विस यांना असं आढळून आलं की, आई होणाऱ्या महिला आणि नुकतेच जन्माला आलेली बाळं अज्ञात आजारांमुळे मरत आहेत.

त्यावेळी डॉ. इग्नाज यांनी असा प्रस्ताव ठेवला की, सर्वातआधी डॉक्टर हात स्वच्छ ठेवणं सुरू करतील. त्यांना असं आढळून आलं की, डॉक्टर आणि इतर स्टाफ नकळत महिला आणि त्यांच्या बाळांना संक्रमित करत होते.

त्यांचा हा प्रस्ताव 1840 मध्ये व्हिएन्नामध्ये लागू करण्यात आला. हा धुण्याची प्रथा लागू केल्यावर मृत्यूदरात वेगाने घट झाली. मॅटर्निटी वॉर्डमधील महिलांच्या मृत्यूचं प्रमाण कमी झालं. पण अनेक डॉक्टरांनी हात धुण्याच्या पद्धतीला गंभीरतेने घेतले नव्हते. त्यामुळे हा प्रयोग जास्त यशस्वी होऊ शकला नाही.

काही डॉक्टर्स हे मानायलाच तयार नव्हते की, हॉस्पिटलमधील अस्वच्छता आणि हातांच्या संक्रमणामुळे आजार पसरलतो. पण डॉ. सेमेल्विस यांची ओळख गर्भवती महिलांचा जीव वाचवणारे डॉक्टर म्हणून झाली होती. नंतर त्यांना हात धुण्याच्या फायद्याचे शोधकर्ता म्हणून ओळखले जाऊ लागले.

डॉ. इग्नाज व्हिएन्नामधील एक जनरल हॉस्पिटलमध्ये फिजिशिअन होते. 20 मार्चला त्यांना मॅटर्निटी क्लीनिक व्हिएन्ना जनरल हॉस्पिटलचं मुख्य रेजिडेंट करण्यात आलं. त्यांच्या शोधाला नंतर फार प्रसिद्धी मिळाली.