बाबो! 'या' जीवाच्या 2 किलो मांसाची किंमत 1 लाख रूपये, आता हे जीव लुप्त होण्याच्या आहे मार्गावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 02:38 PM2020-05-20T14:38:19+5:302020-05-20T14:53:19+5:30

या जीवाचं नाव आहे चायनीज जाएंट सॅलामॅंडर. हा एक फार दुर्मीळ जीव आहे. हा जीव चीनच्या यांग्तजेसहीत काही नद्यांमध्ये आढळतो.

चीनमध्ये लोक वेगवेगळे प्राणी आणि जीव खातात हे काही नवीन नाही. पण लोकांच्या या जीभेच्या चोचल्यांमुळे एक जीव लुप्त होण्याच्या मार्गावर आला आहे. या जीवाचा वापर पारंपारिक औषधे तयार करण्यासाठी केला जातो. (Image Crdit : AFP)

या जीवाचं नाव आहे चायनीज जाएंट सॅलामॅंडर. हा एक फार दुर्मीळ जीव आहे. हा जीव चीनच्या यांग्तजेसहीत काही नद्यांमध्ये आढळतो. तसेच उत्तर अमेरिका आणि जपानमध्येही हा जीव आढळतो. पण सर्वात मोठा चीनचा सॅलामॅंडर असतो. (Image Credit : AFP)

या जीवाला जीवाश्म असं म्हटलं जातं. कारण याचा इतिहास 17 कोटी वर्ष जुना आहे. असे मानले जाते की, हा जीव डायनोसॉरच्या प्रजातीतून विकसित झालाय. (Image Credit : AFP)

1970 मध्ये लोकांना चायनीज जाएंट सॅलामॅंडर खायला सुरूवात केली होती. त्यानंतर लोकांनी याची टेस्ट इतकी आवडली की, याची विक्री मोठ्या प्रमाणात होऊ लागली. चीनमध्ये एका जाएंट सॅलामॅंडरचं दोन किलो मांस 1500 डॉलर म्हणजे 1.13 लाख रूपयांना मिळतं. (Image Credit ; animals.sandiegozoo.org)

चीनमध्ये आता या जीवाचे फार्म उघडले आहेत. जेणेकरून त्यांचं जास्तीत जास्त उत्पादन करता यावं. पण नैसर्गिकपणे हा जीव लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. हा जीव आयुष्यभर पाण्यात राहतो. पण हा जीव माशासारखा नाही. (Image Credit : smithsonianmag.com)

हा जीव त्याच्या छिद्र असलेल्या त्वचेतून ऑक्सिजन घेतो. त्यांचे डोळे फार तेज नसतात, पण ते शिकारला पाण्यावर उठणाऱ्या तरंगावरून ओळखतात. या तरंगांना ओळखणारे सेंसरी नोड्स त्यांच्या डोक्याच्या मागे संपूर्ण शरीरावर असतात.

चीनमध्ये आढळणारा जाएंट सॅलामॅंडर एका माणसाच्या बरोबरीत लांब होऊ शकतो. साधारण 5.90 फूट लांब ते होऊ शकतात. अमेरिकेत आढळणारा सॅलामॅंडरला तिथे द हेलबेंडर म्हणतात. तो 28 इंचाचा असतो. तर जपानमधील चीनच्या सॅलामॅंडरपेक्षा लहान असतो.

दोन वर्षांआधी चीनमध्ये एंड्रयू कनिंगघम नावाचे जीव वैज्ञानिक त्यांच्या 80 लोकांच्या टीमसोबत सॅलामॅंडर शोधायला गेले होते. त्यांनी 50 ठिकाणांचा सर्व्हे केला. अनेकांना विचारले तर त्यांनी सांगितले की, त्यांनी अनेक वर्षापासून हा जीव पाहिला नाही.

एंड्र्यू यांनी सांगितले की, हा जीव ब्रोंटोसॉरस आणि स्टेगोसॉरस जीवांच्या काळातील आहे. त्या काळातील दोनच प्रजातीचे जीव सध्या जिवंत आहेत. एक अमेरिकेत आणि दुसरा जपानमध्ये.

1970 पर्यंत सॅलामॅंडर चीनच्या डोंगराळ भागातील पाण्यांच्या स्त्रोतांमध्ये आढळत होते. त्यांचा आवाज मनुष्यांच्या बाळाच्या रडण्यासारखा येतो. त्यामुळे डोंगरात राहणारे लोक त्यांना खात नव्हते. पण काही लोक आवडीने खातात.