"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 14:00 IST2025-10-01T13:39:07+5:302025-10-01T14:00:16+5:30
1996 मध्ये त्यांचे निधन झाले असले तरी त्यांनी इ.स. 5079 पर्यंतच्या घटनांचा अंदाज वर्तवला असल्याचा दावा केला जातो....

नेत्रहीन भविष्यवक्ता बाबा वेंगा यांची भाकितं हा आजही जगभरातील जनतेसाठी एक उत्सुकतेचा विषय आहेत. त्यांच्या भाकितांमध्ये भीती, रहस्य आणि रोमांच अशा तीनही गोष्टी आढळतात.
1996 मध्ये त्यांचे निधन झाले असले तरी त्यांनी इ.स. 5079 पर्यंतच्या घटनांचा अंदाज वर्तवला असल्याचा दावा केला जातो. महत्वाचे म्हणजे, या संदर्भात कुठलाही लिखित पुरावा अथवा दस्तऐवज उपलब्ध नाही.
वेंगा यांच्या भाकितांमध्ये नैसर्गिक आपत्ती, तिसरे महायुद्ध, मानव जातीचे पतन आणि विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगती, यांचा समावेश आहे. त्यांच्या 2026 या इंग्रजी वर्षासाठीच्या भाकितांसंदर्भात जाणून घेण्यासाठी सोशल मीडिया युजर्स अत्यंत उत्साही दिसत आहेत. तर जाणून घेऊयात...
बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार, 2026 ते 2028 दरम्यान जागतिक पातळीवरील दुष्काळ आणि भूकबळीची समस्या संपुष्टात येईल. चीन आर्थिक आणि सैनिकी शक्तीच्या दृष्टीने अमेरिकेला मागे टाकेल. विज्ञान-तंत्रज्ञानात अभूतपूर्व प्रगती होईल. एवढेच नाही तर, याच काळात तिसऱ्या महायुद्धासारखी स्थितीही दिसून येईल, असे भाकीतही त्यांनी वर्तवले आहे.
बाबा वेंगा यांच्या खऱ्या ठरलेल्या काही भाकितांमध्ये, कुर्स्क पाणबुडी दुर्घटना, आयसिसचा उदय, सिरियातील रासायनिक हल्ला, ब्रेक्झिट, 9/11 चा दहशतवादी हल्ला आणि राजकुमारी डायना यांचे निधन आदींचा समावेश आहे.
भारतासंदर्भात बोलायचे झाल्यास, वेंगा यांनी भारतात अतिवृष्टी, पूर, भूस्खलन आणि तापमानवाढीचे संकट आदी भाकीत वर्तवली आहेत. वेंगा यांच्या मते, देशातील अनेक शहरांमध्ये पाण्याची कमतरता जाणवेल. याचा भारतीय राजकारणावर मोठा परिणाम होईल.
महत्वाचे म्हणजे, वैज्ञानिक या भविष्यवाण्या थेट फेटाळून लावतात. याची दोन कराणे आहेत. एक म्हणजे, भविष्यवाणीचे कोणतेही अधिकृत दस्तएवज उपलब्ध नाहीत. तसेच, अनेक भाकितं वेळेच्या संदर्भात केली गेली असल्याने ती योगायोगाने खरी ठरल्याचे मानले जाते.