बाबो! लग्नातच पाहुण्यांसमोर काढले जातात कपडे अन् करतात किस; चीनमध्ये चालतो हा विचित्र प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 05:45 PM2021-03-23T17:45:44+5:302021-03-23T18:04:34+5:30

Trending Viral News : या लग्नांमध्ये अशा काही प्रथा असतात. ज्यामुळे मुलीला खूपच विचित्र वाटू शकते.

चीनमध्ये लग्नकार्यात आनंदाचं वातावरण असतं. पण कधी कधी नवविवाहितांसाठी शरमेची बाब सुद्धा असते. भारतातील परंपरांप्रमाणेच चीनमध्ये सुद्धा संपूर्ण नातेवाईक, मित्र परिवार लग्न सोहोळ्याला उपस्थित असतो.

या लग्नांमध्येही नाचगाण असतं. नवविवाहित वधू आणि वराचे मित्र आणि मैत्रिणी वेगेवगळे खेळ खेळतात. अनेकदा या लग्नांमध्ये अशा काही प्रथा असतात. ज्यामुळे मुलीला खूपच विचित्र वाटू शकते.

या स्टंट्सना वल्गर असंही म्हटलं जातं. नवविवाहित कपल्सना रुमालात गुंडाळणं, त्यांच्या शरीरावर कोणत्याही वस्तू फेकणं, त्याचे कपडे काढून घेणं असे प्रकार केले जातात. चीनच्या काही शहरांमध्ये अशा प्रकारच्या खेळांवर बंदी घालण्यात आली आहे.

चीनच्या शेनडॉन्ग प्रांतातील जॉपिंग सिटीमध्ये नुकतीच एक नोटीस काढण्यात आली आहे. या नोटीसमध्ये नमुद करण्यात आलं आहे की, लग्नात वधू आणि वराचे कपडे काढणं, बांधून ठेवणं तसंच कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

या नोटिसमध्ये असंही नमूद करण्यात आलं आहे की, नवरा नवरीला कोणीही जबरदस्ती किस करायला सांगू शकत नाही. नवविवाहितांच्या हातापायांना काहीही लावायचं नाही. तसंच त्यांना त्रास होईल असं कोणतंही कृत्य करायचं नाही.

नियमांचे पालन न केल्यास शिक्षासुद्धा करण्यात येईल.

सध्याच्या तरूण जोडप्यांनी याविरुद्ध आवाज उठवण्यास सुरूवात केली आहे. चीनच्या ग्रामीण भागात अजूनही या रितीरिवाजाचे पालन केले जाते.