सद्दाम हुसैनचा तरंगता महाल, मशीद, हेलीपॅड, मिसाइल लॉन्चरही होतं; पण कधीच यावर ठेवू शकला नाही पाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 01:28 PM2023-03-17T13:28:23+5:302023-03-17T13:38:21+5:30

Saddam Hussein superyacht : सद्दाम हुसैनची हुकूमशाही आणि त्याच्या संपत्तीचे किस्से आजही केवळ इराकच नाहीतर जगभरात प्रसिद्ध आहेत.

Saddam Hussein : अनेक वर्ष इराकवर राज्य करणारा हुकूमशहा सद्दाम हुसैनचं शासन अमेरिकेच्या हल्ल्यानंतर संपलं. सद्दाम हुसैनची हुकूमशाही आणि त्याच्या संपत्तीचे किस्से आजही केवळ इराकच नाहीतर जगभरात प्रसिद्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला त्याच्या सोन्याच्या सुपरयॉटबाबत सांगणार आहोत.

बसरा ब्रीज (Basrah Breeze) मध्ये सगळ्या सुविधा आहेत ज्याची सद्दाम हुसैन यांना गरज पडणार होती. यात स्वीमिंग पूल, एक मशीद आणि एक मिसाइल लॉन्चर अशा सुविधा होत्या.

तसेच यात एक प्रेसिडेंशियल सुइट, डाइनिंग रूम आणि बेडरूमसोबतच 17 छोटे गेस्ट रूम होते. त्यासोबतच चालक दलासाठी 18 कॅबिन आणि एक क्लीनिक होतं.

आपलं शासन चालवण्यात बिझी असतानाही हुसैनने हे ठरवलं होतं की, कोणत्याही वेळी प्रवास करण्यासाठी 270 फूटाचं एक जहाज चांगलं तयार असावं.

सुपरयॉटमध्ये ऑपरेटिंग थिएटर आहे. इमरजन्सीमध्ये यावर हेलिकॉप्टर लॅंडीगची सुविधाही होती. या सुपरयॉटचं निर्माण इराक-निर्माण युद्ध सुरू झाल्याच्या एक वर्षांनंतर 1981 मध्ये एका डेनिश शिपयॉर्ड द्वारे करण्यात आलं होतं.

हे आलिशान जहाज तयार करण्यासाठी किती पैसा खर्च झाला याचा खुलासा कधी होऊ शकला नाही, पण अंदाजानुसार, यासाठी कोट्यावधी डॉलरचा खर्च झाला होता.

सद्दाम हुसैन यांनी त्यांचं हे जहाज बनवण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला. पण त्यावर कधी पाय ठेवू शकले नाहीत. ईराणसोबत युद्ध सुरू असताना याला ईराणी शक्तीचं प्रतीक मानलं गेलं. ज्यामुळे हे सुपरयॉट टारगेटवर आलं.

बसरा ब्रीज़ला हवाई हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी त्याला त्यावेळी सहयोगी असलेल्या सौदी अरबकडे पाठवण्यात आलं. पण नंतर 1990 मध्ये कुवैतवर हल्ला केल्यानंतर सद्दामचे सौदी अरबसोबत संबंध बिघडले. त्यानंतर जहाज जॉर्डनकडे सोपवण्यात आलं.