चेहरा की कॅनव्हास? ही कला पाहून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 22:39 IST2019-06-12T22:36:18+5:302019-06-12T22:39:52+5:30

मुलींना मेकअपची अतिशय आवड असते. मात्र डेन यून नावाच्या तरुणीनं मेकअपचं कौशल्य जपताना एक पाऊल पुढे टाकलं आहे.

मेकअपचा वापर करुन दृष्टीभ्रम निर्माण करण्याचं कौशल्य डेन यूननं साधलं आहे.

मेकअपसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा वापर करुन चेहऱ्यावर एकापेक्षा एक कलाकृती साकारण्याचं कौशल्य डेनकडे आहे.

इन्स्टाग्रामवर डेनच्या फोटोंचं अनेकांनी कौतुक केलं आहे.

समोरच्या व्यक्तीचा दृष्टीभ्रम व्हावा असा मेकअप करण्याचं कौशल्य तिनं आत्मसात केलं आहे.

चेहऱ्यावर आभाळ, पुस्तक, निसर्ग साकारण्याची किमया डेन अगदी लिलया करुन दाखवते.