रॅपरने सर्जरी करून डोक्यावर लावले सोन्याचे केस, काळ्या केसांऐवजी उडवत फिरतो गोल्डन चेन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 04:45 PM2021-09-10T16:45:21+5:302021-09-10T16:51:41+5:30

त्याने सांगितलं की, मनुष्याच्या इतिहासात तो पहिला व्यक्ती आहे ज्याने ट्रान्सप्लांट केलं. या सर्जरीनंतर इन्स्टाग्रामवर त्याचे फालोअर्सही वाढले आहेत.

जगभरात असे अनेक शौकीन लोक असतात जे त्यांचा शौक पूर्ण करण्यासाठी काहीही करतात. अमेरिकेत राहणाऱ्या डॅन सुरने शौकाखातर हेअर ट्रान्सप्लांट केलं. त्याने सर्जरी करून केसांऐवजी सोन्याच्या चेन्स डोक्यावर लावल्या आहेत. अमेरिकेतील रॅपर डॅन सूरचे नवे फोटो व्हायरल झाले आहेत. त्याने केसांऐवजी डोक्यावर लावलेल्या सोन्याच्या जाड जाड चेनची चर्चा होत आहे.

रॅपरने आपल्या गोल्डन केसांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. जे बघून लोक हैराण झाले आहेत. डॅनने दावा केला आहे की, अशाप्रकारे हेअर ट्रान्सप्लांट करणारा तो जगातला पहिला व्यक्ती आहे.

रिपोर्ट्सनुसार, डॅनने सर्जरीच्या माध्यमातून आपल्या डोक्यावरील केस काढले. त्यानंतर त्याने कपाळावर एक हुक लावत त्यावर सोन्याच्या चेन्स लावल्या आहेत. डॅनच्या डोक्यावर लटकणाऱ्या या गोल्डन चेन बघून सगळेजण हैराण आहेत.

डॅनने फारच जाड जाड चेन लावल्या आहेत. अमेरिकेतील या आर्टिस्टने आपल्या सोशल मीडिया फॅन्सला सांगितलं की, सत्य हे आहे की, तो बऱ्याच वर्षांपासून असं काहीतरी करण्याचं प्लॅनिंग करत होता. त्याला इतरांप्रमाणे त्याचे केस डाय करायचे नव्हते. त्याला काहीतरी वेगळं करायचं होतं.

आपली ही इच्छा पूर्ण करण्यासाठी डॅनने सर्जरी करून आपले केस काढले. केसांजागी त्याने सोन्याच्या चेन लावल्या. या चेन कवटीच्या आत लावलेल्या हुकच्या मदतीने लटकवल्या आहेत. डॅन त्याच्या या गोल्डन हेअरमुळे आनंदी आहे.

त्याने सांगितलं की, मनुष्याच्या इतिहासात तो पहिला व्यक्ती आहे ज्याने ट्रान्सप्लांट केलं. या सर्जरीनंतर इन्स्टाग्रामवर त्याचे फालोअर्सही वाढले आहेत.

Read in English