शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'हा' आहे स्वर्गात जाण्याचा रस्ता, एका देशातून जातो मार्ग; पण होतोय बंद....कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 2:30 PM

1 / 10
अमेरिकेतील होनोलूलूमधलं‘स्वर्गाची शिडी’ (Stairway to Heaven) नावाचं लोकप्रिय आणि प्रसिद्ध ठिकाण आता बंद होणार आहे. तेथील नगर परिषदेनं हे ठिकाण हटवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच बहुमतानं हा प्रस्ताव पारित झाला.
2 / 10
अमेरिकेतील होनोलूलमध्ये एक 3922 पायऱ्यांचा जिना आहे, जो तिथं येणाऱ्या पर्यटकांना तब्बल 2400 फूटांवर घेऊन जातो. हे ठिकाण ‘स्वर्गाची शिडी’ या नावानं ओळखलं जातं. दरवर्षी शेकडो लोक या ठिकाणाला भेट देण्यासाठी येतात.
3 / 10
हे ठिकाण अत्यंत धोकादायक असून या ठिकाणी नागरिकांच्या जीवाला धोका पोहोचण्याची शक्यता आहे.
4 / 10
हे ठिकाण अत्यंत धोकादायक असून या ठिकाणी नागरिकांच्या जीवाला धोका पोहोचण्याची शक्यता आहे.
5 / 10
१९४२ साली अमेरिकेच्या सैन्यानं अँटिना लावण्यासाठी हा मार्ग बनवला होता. शहराच्या एका भागाचा दुसऱ्या भागाशी संपर्क व्हावा, यासाठी हा अँटीना उभारण्यात आला होता.
6 / 10
इथे चढणं अत्यंत धोकादायक असल्याने येथे येण्यास बंदी आबे. तसेच या पायऱ्या चढणं बेकायदेशीर ठरवण्यात आलं आहे. मात्र तरीही हजारो लोक या ठिकाणी येतात. या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकांची नजर चुकवण्यासाठी ते येण्यापूर्वीच अनेक नागरिक या ठिकाणी दाखल होतात.
7 / 10
पूर्वी या पायऱ्या लाकडी होत्या. त्यानंतर त्या काँक्रिटच्या करण्यात आल्या. नागरिक या ठिकाणी प्रवेश कऱणं कायदेशीर करावं, अशी मागणी करत आहेत.
8 / 10
असोसिएटेड प्रेसने दिलेल्या माहितीनुसार ४ मार्च ते २३ मार्च या कालावधीत इथं या पायऱ्या चढणाऱ्या ६ पर्यटकांना पोलिसांनी अटक केली आहे.
9 / 10
वास्तविक, हे ठिकाण धोकादायक असलं तरी आतापर्यंत या ठिकाणी एकाच नागरिकाचा मृत्यू झाला आहे. गायक आणि हास्य कलाकार फ्रिट्झ हसनपुश यांना या ठिकाणी हृदयविकाराचा झटका आला होता.
10 / 10
येथे नियमांच उल्लंघन झाल्यावर १ हजार डॉलर इतका दंज आकारण्यात येतो.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAmericaअमेरिका