शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Anna Hajare: ... म्हणून अण्णा हजारेंचा वाईनला विरोध, खडसेंनी अगदी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 9:49 AM

1 / 10
किराणा दुकानातून वाईन विक्रीच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. त्यावरुन, राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे.
2 / 10
अण्णा हजारेंची भूमिका नेहमीच भाजपला समर्थनाची असते, अशा पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. तर, महाविकास आघाडीचे नेतेही अण्णांच्या भूमिकेवर बोलत आहेत.
3 / 10
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Ravi Rana) यांनी देखील अण्णा हजारे यांना पाठींबा देत त्यांच्यासोबत वाईन विक्रीच्या विरोधात उपोषणाला बसणार असल्याची माहिती दिली.
4 / 10
किराणा दुकानातील वाईन विक्रीमुळे येणारी पिढी व महिलांचे भविष्य खराब होईल. त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी नवनीत राणा यांनी केली.
5 / 10
राज्य सरकारने वाईन विक्रीसंबंधी घेतलेल्या चुकीच्या धोरणाविरोधात 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण केले जाणार आहे, असं पत्रकात म्हटले आहे. याबाबत, आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी अण्णांच्या विरोधावर भाष्य केलंय.
6 / 10
द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांनी अण्णा हजारेंची भेट घेतली. या शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा आणि वेदना सांगितल्या.
7 / 10
मार्केटमध्ये, द्राक्षांना भाव पाहिजे असेल तर उपउत्पादनांवर भर दिला पाहिजे. त्यामध्ये, वाईन हा प्रकार अगदी अलीकडच्या कालखंडांत सर्वत्र विकलाच जात आहे, अशी त्यांची भूमिका आहे.
8 / 10
याउलट वाईन ही दारू आहे, त्यामुळे गावापर्यंत दारू जात आहे, अशा स्वरुपाची भूमिका अण्णा हजारेंची आहे. म्हणून त्यांनी वाईनला विरोध केला आहे, असे एकनाथ खडसेंनी म्हटले.
9 / 10
मध्यप्रदेशात मॉलमध्ये बिअर विकायला भाजप सरकारने परवानगी दिली. आंध्र प्रदेशमध्ये भाजपला निवडून दिलं तर दारुही गरिबांच्या हिताची असल्याने पन्नास रुपयांमध्ये दारू देऊ असे वक्तव्य तेथील प्रदेशाध्यक्षांनी केले आहे.
10 / 10
त्यामुळे वाईनबाबत भाजपची दुटप्पी भूमिका का? असा सवालही एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे.
टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेanna hazareअण्णा हजारेBJPभाजपाliquor banदारूबंदी