जगातल्या सुंदर महिलेचं दोन वर्षात मोडलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 07:31 PM2018-02-16T19:31:03+5:302018-02-16T19:34:20+5:30

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर अॅनिस्टन आणि जस्टिन थेरॉक्सने लग्नानंतर अवघ्या दोन वर्षात विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

2011 पासून दोघांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली होती. ऑगस्ट 2015 मध्ये त्यांनी लग्न केले.

आम्ही दोघे परस्परांचे चांगले मित्र असून आमच्यातील ही मैत्री पुढेही कायम राहिलं असे दोघांनी म्हटले आहे. वँडरलस्ट चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान दोघांच्या प्रेम प्रकरणाला सुरुवात झाली होती.

दोन वर्षांपूर्वी पीपल मॅगझिनने २०१६ मधील सर्वात सुंदर महिला म्हणून हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर अॅनिस्टनची निवड केली होती.

जेनिफरचा याआधी अभिनेता ब्रॅड पीटबरोबर विवाह झाला होता. पाच वर्षाच्या विवाहानंतर त्यांनी 2005 साली घटस्फोट घेतला.