व्हेनेझुएलानंतर कुणाचा नंबर? हे ५ देश डोनाल्ड ट्रम्प यांच्या रडारवर, कोण होणार पुढचं लक्ष्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 23:04 IST2026-01-04T23:03:00+5:302026-01-04T23:04:56+5:30

Donald Trump News: या वर्षाच्या सुरुवातीलाच अमेरिकेने एक धडाकेबाज मोहीम हाती घेत व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस माडुरो यांना त्यांच्या देशाच्या राजधानीतूनच अटक करून अमेरिकेत आणलं आहे. त्यामुळे आता अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या रडारवर पुढचा देश कोणता असेल याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. जागतिक राजकारणातील सध्याची स्थिती पाहता काही देश अमेरिकेच्या रडारवर आहेत. त्यातील प्रमुख पाच देश खालील प्रमाणे आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीलाच अमेरिकेने एक धडाकेबाज मोहीम हाती घेत व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस माडुरो यांना त्यांच्या देशाच्या राजधानीतूनच अटक करून अमेरिकेत आणलं आहे. त्यामुळे आता अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या रडारवर पुढचा देश कोणता असेल याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. जागतिक राजकारणातील सध्याची स्थिती पाहता काही देश अमेरिकेच्या रडारवर आहेत. त्यातील प्रमुख पाच देश खालील प्रमाणे आहेत.

व्हेनेझुएलानंतर इराण हा अमेरिकेच्या रडारवर असणारा पुढचा देश असू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून इराणमधील आंदोलनांना अमेरिकेचा पाठिंबा मिळत आहे ते पाहता या शक्यतेला वाव मिळत आहे. काही विश्लेषकांच्या मते ट्रम्प प्रशासनाने इराणविरोधात लष्करी कारवाईची धमकी याआधीही दिसेली आहे. तसेच इराणमधील घडामोडींवर आपलं लक्ष असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. त्यामुळे आपल्या हितसंबंधांना धोका उत्पन्न होत असल्याची शंका आल्यास अमेरिका तिथे कारवाई करण्यास मागे पुढे पाहणार नाही.

दक्षिण अमेरिकेतील क्युबा हा देशसुद्धा अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरत आला आहे. तसेच अमेरिकन सरकार क्युबामध्ये बळाचा वापर करून सत्तापरिवर्तन करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप क्युबाकडून करण्यात येत असतो. व्हेनेझुएलाच्या प्रकरणात क्युबाचा पाठिंबा निकोलस माडुरो यांना राहिलेला आहे. तसेच क्युबाने व्हेनेझुएला या देशाला ऊर्जा आणि लष्करी मतद केलेली आहे.

याबरोबरच कोलंबिया हा देशसुद्धा अमेरिकेच्या रडारवर आहे. कोलंबियाने व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेने केलेल्या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच अमेरिकेने केलेला हल्ला हा या भागातील प्रादेशिक स्थैर्याला धोक्यात आणू शकतो, अशी भीती कोलंबियाकडून व्यक्त करण्यात आली आहे. कोलंबियाने जेव्हा जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केला. तेव्हा ट्रम्प यांनी तुम्ही आधी स्वत:चे प्रश्न पाहा, असे कोलंबियाच्या राष्ट्रपतींना सुनावले होते.

याशिवाय युरोपमधील डेन्मार्क आणि डेन्मार्कच्या अधिपत्याखालील ग्रीनलँड हा प्रदेशसुद्धा अमेरिकेच्या विस्तारवादी धोरणामध्ये रडारवर असण्याची शक्यता आहे. डॅनिश संरक्षण गुप्तचर एजन्सीने हल्ली अमेरिकेला आपला सहकारी म्हणून नव्हे तर संभाव्य धोका म्हणून अधोरेखित केले आहे. ग्रीनलँडला अमेरिकेचा भाग बनवण्याची इच्छा डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे दोन्ही देशांत कुटनीतिक पातळीवर तणावही निर्माण झाला होता. तसेच ग्रीनलँडमध्ये कुठलाही बाह्य हस्तक्षेप खपवून घेलला जाणार नाही, असे डेन्मार्कने स्पष्ट केले होते.