ट्रम्प प्रशासनाला कोर्टात खेचणारी भारतीय तरुणी कोण? कशासाठी घेतलीय कोर्टात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 23:30 IST2025-04-17T23:24:35+5:302025-04-17T23:30:01+5:30

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजवटीत, अमेरिकेतील अनेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना हद्दपारीचा धोका निर्माण झाला आहे.

अमेरिकेत राहणाऱ्या चार स्थलांतरित विद्यार्थ्यांनी तेथील ट्रम्प सरकारविरुद्ध खटला दाखल केला आहे. त्यांचा 'विद्यार्थी इमिग्रेशन दर्जा' बेकायदेशीरपणे संपुष्टात आणण्यात आल्याचा आरोप ट्रम्प प्रशासनावर आहे.

विद्यार्थ्यांनी न्यायालयासमोर आम्हाला हद्दपार केले जाऊ शकते अशी भीती व्यक्त केली. या चार विद्यार्थ्यांपैकी दोन चीनचे, एक नेपाळचा आणि एक भारतातील आहे. ते सर्व मिशिगनमधील सार्वजनिक विद्यापीठांमध्ये शिकतात.

ट्रम्प सरकारविरुद्ध न्यायालयात गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यानीचे नाव चिन्मय देवरे आहे. ट्रम्प सरकारने कोणतीही सूचना न देता त्यांचा 'विद्यार्थी इमिग्रेशन दर्जा' रद्द केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

हा दर्जा त्यांना परत देण्यात यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनीने केली आहे. जेणेकरून ते त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतील आणि कोणत्याही प्रकारची अटक किंवा हद्दपारी टाळता येईल.

देवरेच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ती मिशिगनमधील वेन स्टेट युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये पदवीधर विद्यार्थीनी आहे. २१ वर्षीय देवरे ऑगस्ट २०२१ पासून येथे कॉम्प्युटर सायन्सचे घेत आहे.

देवरे २००४ मध्ये पहिल्यांदाच 'एच-४ डिपेंडेंट व्हिसावर' अमेरिकेला गेली होती. ती आणि त्याचे कुटुंब २००८ मध्ये भारतात परतले. त्यानंतर २०१४ मध्ये ती पुन्हा तिच्या कुटुंबासह अमेरिकेला गेली. वेन विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वी तिने मिशिगनमध्ये हायस्कूल पूर्ण केले.

मे २०२२ मध्ये, ती 'एच-४ डिपेंडेंट व्हिसासाठी' वयोमर्यादेच्या जवळ होती. म्हणून तिने कायद्यानुसार अर्ज सादर केला आणि तिला F-1 विद्यार्थी व्हिसाचा दर्जा मिळाला. देवरेला मे २०२५ मध्ये पदवी पूर्ण करण्याची आशा आहे. सध्या ती तिच्या कुटुंबासह कॅन्टनमध्ये राहते.