५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 13:18 IST2025-07-07T12:58:34+5:302025-07-07T13:18:26+5:30

Japan Manga Artist Prophecy: 5 जुलै रोजी जपानवर मोठे संकट येणार असल्याची भविष्यवाणी आधुनिक बाबा वेंगा समजल्या जाणाऱ्या जपानी महिला रियो तात्सुकी यांनी केली होती.

5 जुलै रोजी जपानवर मोठे संकट येणार असल्याची भविष्यवाणी आधुनिक बाबा वेंगा समजल्या जाणाऱ्या जपानी महिला रियो तात्सुकी यांनी केली होती.

जपानमध्ये गेल्या महिनाभरात एका बेटावर ९०० हून अधिक भूकंप आले आहेत. यामुळे लोक दहशतीत होते.

मागील वेळच्या त्सुनामीची तात्सुकी यांनी भविष्यवाणी खरी ठरली होती, यामुळे जपान सरकारही या आपत्तीसाठी तयारी करत होते.

जपानमध्ये हा काळ पर्य़टनाचा असतो. जगभरातून लोक जपानला जात असतात. तात्सुकीच्या भविष्यवाणीने त्यांनी सर्व विमाने, हॉटेलची बुकिंग रद्द केली होती.

परंतू, तात्सुकीची भविष्यवाणी खरी ठरलीच नाही. ५ जुलैला जपानमध्ये काहीच घडले नाही. यामुळे जपान सरकारला सर्वाधिक हायसे वाटले आहे.

परंतू धोका अद्यापही टळलेला नाही, भूकंपाचे धक्के बसत आहेत. यामुळे येत्या काळात देखील मोठ्या आपत्तीचे संकट येऊ शकते, असे तिथे सांगितले जात आहे.

एका मंगा कॉमिकने ५ जुलै २०२५ रोजी मोठ्या आपत्तीची भाकीत केले होते. ते २०२१ मध्ये पुन्हा प्रकाशित झाले होते.

यामुळे या उन्हाळ्यात परदेशी पर्यटकांनी जपानकडे पाठ फिरविली होती. बुकिंग नसल्याने विमाने देखील रद्द करावी लागली होती.