नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Russia Ukraine War: युद्धाला तोंड फुटले? रशियाच्या तोफा आग ओकू लागल्या; युक्रेन हवेत मिसाईल डागू लागला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 15:37 IST
1 / 9कीव : युरोप आणि आशियाच्या सीमेवर युद्धाचे ढग आता गडद झाले असून कोणत्याही क्षणी भडका उडू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेने तर या २४ तासांत रशिया युक्रेनवर हल्ला करेल असा इशारा दिला आहे. यातच रशियाच्या तोफा, रणगाडे आता धडाडू लागल्याने चिंता वाढली आहे. रशियाने युक्रेनला जमीन, पाणी आणि हवा या तिन्ही मार्गांनी घेरले आहे. 2 / 9रशिया आणि बेलारुसने जोरदार युद्धाभ्यास सुरु केला आहे. या युद्धाभ्यासात ३० हजार सैनिक, टँक आणि तोफाचा सहभाग आहे. यातच रशिया आणि बेलारुसला सडेतोड उत्तर म्हणून युक्रेनच्या सैन्याने देखील १० दिवासांचा युद्धसराव करण्यास सुरुवात केली आहे. 3 / 9युक्रेनचे सैन्य देशाला वाचविण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करत आहे. अमेरिकेसह नाटोचे सैन्यदेखील युरोपच्या सीमेवर दाखल झाले आहे. सोव्हिएत रशियाला गाडण्यासाठी या नाटोची स्थापना झाली होती. या सैन्यामध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्ससह अनेक युरोपीय देश आहेत. 4 / 9युक्रेनच्या पाठीमागे मोठी शक्ती उभी ठाकली असली तरी युक्रेनने तुर्कस्तानकडून मिळालेले खतरनाक ड्रोन बायरकतारद्वारे हल्ला करण्याचा युद्धसराव सुरु केला आहे. याशियाव युक्रेनच्या सैन्याला अमेरिकेकडून मिळालेल्या जवेलिन अँटी टँक मिसाईल आणि ब्रिटनच्या बंकर उद्ध्वस्त करण्याची मिसाईलद्वारे प्रशिक्षण दिले जात आहे. 5 / 9गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या तणावामुळे दोन्ही देशांचे सैन्य तयारी करत आहे. यामुळे कोणी बेसावध राहिलेले नाहीय. यामुळे जर रशियाने हल्ला केला तर घणघोर युद्ध पेटण्याची शक्यता आहे. 6 / 9रशियाने युक्रेनच्या सीमेवर १ लाख ३० हजार सैनिक तैनात केले आहेत. त्यांच्यासोबत १०० टीम, इश्कंदरसह खतरनाक मिसाईल, सुखोई ३५ फायटर जेट आणि टी ७२ सोबत हजारो घातकी रणागाडे तैनात केले आहेत. हे रणगाडे आता आग ओकू लागले आहेत. 7 / 9जर हे युद्ध झालेच तर जवळपास ५० हजार सैनिक मारले जातील, अशी भीती अमेरिकेने गेल्याच आठवड्यात व्यक्त केली आहे. रशिया आणि बेलारूस युद्धसरावाकडे नाटोचे लक्ष वेधून युक्रेनवर अचानक हल्ला करण्याची शक्यता अमेरिकेने व्यक्त केली आहे. 8 / 9गेल्याच आठवड्यात रशियाने भूमध्य समुद्रात युध्दनौका पाठवत असल्याचे सांगून युक्रेनजवळच्या काळ्या समुद्रात वळविल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 9 / 9नाटो आणि अमेरिका यावर लक्ष ठेवत असूनही रशियाच्या युद्धनौकांना त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला नाही. तसे केले असते तर रशियाने हल्ला समजून युध्दाला सुरुवात केली असती, यामुळे त्यांनी बघ्याची भूमिका घेतली आहे.