अखेर व्हाईट हाऊस सोडून अब्जाधीश डोनाल्ड ट्रम्प कुठे वास्तव्यास जाणार? जाणून घ्या

By प्रविण मरगळे | Published: December 16, 2020 10:29 AM2020-12-16T10:29:17+5:302020-12-16T10:36:31+5:30

डिसेंबरच्या अखेरीस डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मेरिकी राष्ट्रपती भवन सोडण्याची वेळ येईल. याविषयी आधीपासून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ट्रम्प यांच्या जाण्यापासून जो बायडन यांच्या आगमनादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये बरेच बदल होणार आहेत.

त्याचबरोबर हा प्रश्न देखील उद्भवत आहे की, राष्ट्रपती भवन सोडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प कुठे जाणार आहेत? मात्र ट्रम्प यांच्याजवळ राहण्यासाठी भव्य आशियानांची कमतरता नाही. ट्रम्प टॉवरचा उल्लेख डोनाल्ड ट्रम्पच्या भव्य आशियानात वारंवार आढळतो.

न्यूयॉर्क शहरात ५६ मजली टॉवर आहे. या टॉवरमध्ये बांधलेल्या पेंटहाउसमध्ये ट्रम्प यांचे स्वतःचे निवासस्थान आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे घर राजवाड्यापेक्षा कमी नाही. त्याचे घर २४ कॅरेट सोन्याचे आणि संगमरवरी साहित्यांसह सजलेले आहे.

या टॉवरमध्येच ट्रम्पच्या व्यवसायासाठी अनेक कार्यालये आहेत. २०१७ मध्ये फोर्ब्सने असा अंदाज वर्तवला होता की, या पेंटहाउसची किंमत सुमारे ६४ दशलक्ष डॉलर्स असेल.

गोल्फ क्लब बेडमिन्स्टर नावाच्या न्यू जर्सी येथे डोनाल्ड ट्रम्पचा बंगला देखील आहे. हा बंगला सुमारे ५०० चौरस फूट भागात पसरलेला आहे आणि येथे ते बर्‍याचदा एकटे राहतात. त्यात बाल्कनी आणि पोर्च सारख्या वस्तू जोडल्या गेल्या. तसे अगदी सुंदर असूनही, हा बंगला डोनाल्ड ट्रम्प यांच्या इतर घरांइतका आलिशान नाही.

ट्रम्प यांचे न्यू कॅसलमध्ये सेव्हन स्प्रिंग्स नावाचे एक आलिशान घर आहे, जे अंदाजे २८,३२२ चौरस फूटात पसरले आहे. म्हणजेच हे घर व्हाईट हाऊसच्या अर्ध्या भागात बांधलेले आहे. व्हाईट हाऊस ५० हजार चौरस फूट भागात बांधलेले आहे.

ट्रम्प यांच्या पॅलेसियल हाऊसमध्ये १३ बेडरूमसह ६० खोल्या आहेत. याशिवाय येथे तीन जलतरण तलाव आणि खेळण्यासाठी मोठी मैदानं आहेत. अमेरिकेचे व्यवसायिक हेन्झ यांच्याकडून ट्रम्प यांनी बंगला मोठ्या किंमतीत विकत घेतला आहे. फोर्ब्स त्याला फॅमिली रिट्रीट बंगला म्हणतो.

डोनाल्ड ट्रम्पच्या मोठ्या निवासी मालमत्तांपैकी एक ट्रम्प पार्क येथे न्यूयॉर्क सिटीत देखील आहे. ही एक ३६ मजली इमारत आहे, त्यापैकी एकावर ट्रम्प वारंवार येत राहतात. या इमारतीचे उर्वरित मजले भाड्याने देण्यात आले आहेत आणि प्रत्येक मजल्यावरील घरांचे भाडे दरमहा सुमारे १ लाख डॉलर आहे.

मॅनहॅटनमध्ये ट्रम्प पार्क एव्हेन्यू नावाच्या संपूर्ण कॅम्पसचे मालक आहेत, ज्यात अनेक अपार्टमेंट्स आहेत. येथेच ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रम्प आणि तिचे कुटुंब २०११ ते २०१७ दरम्यान एका पेन्टहाऊसमध्ये राहत होते. त्यानंतर पेंटहाउस चीनी-अमेरिकन उद्योजक अँजेला शेन यांना सुमारे १५.९ दशलक्ष डॉलर्सवर विकण्यात आले.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बायडन यांनी विजय मिळवला आहे. मात्र, ट्रम्प यांनीही अद्याप आपला पराभव स्वीकारलेला नाही. एवढेच नाही, तर निवडणूक निकालाविरोधत त्यांनी अनेक खटलेही दाखल केले आहेत.