By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 18:18 IST
1 / 10मागील एक महिन्यापासून इराणच्या शाहेद ड्रोनने आखाती देशात हाहाकार माजवला आहे. कमी खर्चात बनणाऱ्या या ड्रोनने अमेरिका इस्रायलविरुद्ध युद्धात इराणसाठी सर्वात मोठं शस्त्र बनले आहे. विशेष म्हणजे अमेरिका त्यांच्या सैन्य ठिकाणांवरील हल्ला रोखण्यासाठी कोट्यवधी डॉलरच्या मिसाइलचा वापर करत आहे. त्यात आखाती प्रदेशापासून ४ हजार किमी दूर असलेला एक देश मदतीसाठी पुढे आला आहे.2 / 10हा देश आहे युक्रेन...गेल्या ४ वर्षापासून युक्रेन रशियासोबत युद्ध लढत आहे. युक्रेनकडे शाहेद ड्रोन्सना मारण्याचा चांगला अनुभव आहे. इतकेच नाही तर युक्रेनने स्वस्त स्टिंग आणि बुलेट इंटरसेप्टर मोठ्या प्रमाणात उत्पादन केले आहे. काही आठवड्यांपूर्वी युद्धाच्या सुरुवातीच्या काळात अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ते युक्रेनी राष्ट्रपती झेलेन्स्की शेवटचे व्यक्ती असतील, ज्यांच्याकडे मी मदत मागेन असं म्हटलं होते. एक महिन्याच्या आत इराणने मध्य पूर्वेतील अमेरिकन तळांवर, ऊर्जा प्रकल्पांवर मोठे हल्ले केले. ज्यात भरपूर नुकसान झाले3 / 10महिनाभरापासून सुरू असलेल्या या युद्धाचा खर्च अब्जावधी डॉलरपर्यंत पोहचला आहे. त्यात आखाती देशांनी आता युक्रेनकडे मोर्चा वळवला आहे जेणेकरून इराणच्या शाहेद ड्रोनच्या हल्ल्यातून त्यांच्या देशाला वाचवता येईल. तत्पूर्वी कतार, संयुक्त अरब अमीरात आणि सौदी अरेबियामध्ये झेलेन्स्की यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी एक करार झाला ज्याअंतर्गत युक्रेन आपले स्टिंग इंटरसेप्टर्स या देशांना पुरवेल आणि त्या बदल्यात रशियाविरोधात वापरण्यासाठी प्रगतशील एअर डिफेन्स मिसाइलला त्याला मिळेल.4 / 10युक्रेनने आधीच २०० हून अधिक एंटी ड्रोन एक्सपर्ट मध्य-पूर्वेत पाठवले आहे, जे जॉर्डन आणि कुवेतमध्ये शाहेद ड्रोनचा मुकाबला करण्यास मदत करत आहेत. मात्र आखाती देश युक्रेनची मदत का मागत आहेत? युक्रेन अचानक आखाती देशांच्या आकर्षणाचे केंद्र का बनले आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. 5 / 10याचे उत्तर युद्धाच्या आर्थिक खर्चात दडलेले आहे. मध्य-पूर्वेतील युद्धांनी हल्ले किती स्वस्त झाले आहेत हे दाखवून दिले तर संरक्षण अधिक महाग झाले आहे. म्हणजेच इराणच्या शाहेद १३६ ड्रोनची किंमत सुमारे वीस हजार ते तीस हजार डॉलर्स आहे. एका महिन्यात हजारो ड्रोन वेगाने तयार केले जाऊ शकतात.6 / 10या स्वस्त ड्रोन आणि क्षेपणास्त्रांमुळे अमेरिकेच्या तळांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचा सामना करण्यासाठी अमेरिका आणि तिचे मित्र देश पॅट्रियट मिसाइल आणि THAAD सिस्टमसारख्या महागड्या शस्त्रांचा वापर करत आहेत. ज्यांचा आता तुटवडा आहे. शिवाय एफ-१६ सारखी लढाऊ विमाने हवेत ठेवणे खूप महाग आहे, ज्यासाठी प्रति तास अंदाजे २५,००० डॉलर्स खर्च येतो आणि त्यातून डागलेल्या क्षेपणास्त्रांमुळे हा खर्च आणखी वाढतो.7 / 10युक्रेनने काही वर्षापूर्वी अशाच परिस्थितीचा सामना केला होता जेव्हा रशियाने इराणकडून मिळालेल्या शाहेद ड्रोनचा वापर हल्ल्यासाठी केला. पाश्चात्य देशांकडून पुरेसी मदत मिळत नसल्याने युक्रेनने स्वत:च स्वस्त आणि प्रभावी मार्ग विकसित केला. २ वर्षाच्या मेहनतीनंतर शाहेद किलर समोर स्टिंग आणि बुलेट इंटरसेप्टर्स समोर आले. त्यातून स्वस्त ड्रोनचा मुकाबला स्वस्त आणि स्मार्ट ड्रोनने करण्यात आला.8 / 10हे इंटरसेप्टर्स सहज उपलब्ध होणाऱ्या भागांपासून बनवलेले आहेत आणि त्यांचा यशस्वी होण्याचा दर ७० ते ९० टक्के आहे. युक्रेनने फेब्रुवारीमध्ये रशियाने पाठवलेल्या ५,००० ड्रोनपैकी ८७ टक्के ड्रोन पाडले. जॅमिंग किंवा तांत्रिक समस्या टाळण्यासाठी ऑपरेटर एफपीव्ही गॉगल्स वापरून हे ड्रोन नियंत्रित करतात. स्टिंग इंटरसेप्टर सर्वात वेगवान आणि सर्वात घातक आहे. तो ताशी ३१५-३४० किमी वेगाने उडू शकतो. १०,००० फूट उंचीपर्यंत पोहोचू शकतो आणि थर्मल कॅमेऱ्यांचा वापर करून टार्गेट शोधू शकतो. 9 / 10विशेष म्हणजे जर त्याला त्याचे टार्गेट सापडले नाही तर तो परत येऊ शकतो. बुलेट इंटरसेप्टर जेट इंजिन आणि चार रोटर्सने सुसज्ज आहे, तो ३डी-प्रिंट केला जाऊ शकतो आणि लक्ष्य शोधण्यासाठी एआय (AI) वापरतो. शाहेद ड्रोन आणि यात मुख्य फरक तंत्रज्ञानामध्ये आहे. शाहेद ड्रोन हे जीपीएस-मार्गदर्शित आत्मघाती किंवा कामिकाझे ड्रोन आहेत, जे टार्गेटवर आदळल्यानंतर स्वतःला नष्ट करतात. मात्र युक्रेनच्या 'स्टिंग'सारखे इंटरसेप्टर परत करून पुन्हा वापरता येतात, ज्यामुळे खर्चात लक्षणीय घट होते.10 / 10इराणने हजारो शाहेद ड्रोन तैनात करून अमेरिका आणि आखाती देशांच्या संरक्षण यंत्रणांवर दबाव आणला आहे. अनेक ड्रोन पाडण्यात आले असले तरी त्याची मोठी किंमत मोजावी लागली. युक्रेनने तीन वर्षांच्या अनुभवाचा वापर करून या ड्रोनचा सामना करण्याच्या पद्धती विकसित केल्या. आता युक्रेन आखाती देशांसाठी ड्रोनविरोधी तंत्रज्ञानाचा एक प्रमुख पुरवठादार म्हणून उदयास आला आहे. यामुळे त्याची जागतिक भूमिकाही बदलत आहे.