या देशांमध्ये आहे अमेरिकेपेक्षाही श्रीमंती, दरडोई उत्पन्नाचा आकडा वाचून डोळे विस्फारतील

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 02:43 PM2018-10-11T14:43:44+5:302018-10-11T15:04:45+5:30

जगातील सर्वात श्रीमंत देश म्हटलं की आपल्या नजरेसमोर येते ती अमेरिका. पण अमेरिकेपेक्षाही श्रीमंती आणि अधिक दरडोई उत्पन्न असलेले देश या जगात आहेत. अशाच काही देशांबद्दलची ही विशेष माहिती.

संयुक्त अरब अमिराती - संयुक्त अरब अमिराती हा जगातील आठवा सर्वात श्रीमंती असलेला देश आहे. या देशातील दरडोई उत्पन्न 68,662 डॉलर एवढे आहे.

नॉर्वे - सर्वाधिक श्रीमंती असलेल्या देशांमध्ये नॉर्वे सातव्या स्थानावर आहे. येथील दरडोई उत्पन्न 74,065 डॉलर एवढे आहे.

ब्रुनोई - सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत ब्रुनोईचा सहावा क्रमांक लागतो. येथील दरडोई उत्पन्न 79,726 डॉलर एवढे आहे.

आयर्लंड - आयर्लंड हा जगातील पाचवा सर्वाधिक श्रीमंती असलेला देश आहे. येथील दरडोई उत्पन्न 79,925 डॉलर एवढे आहे.

सिंगापूर - एका छोट्याशा शहराएवढा असणारा सिंगापूर हा देश श्रीमंती असलेल्या देशांच्या क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे. येथील दरडोई उत्पन्न 98,014 डॉलर एवढे आहे.

लक्झेम्बर्ग - युरोपमधील लक्झेम्बर्ग हा देश सर्वाधिक श्रीमंती असलेल्या देशांमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. येथे दरडोई उत्पन्न तब्बल 110,870 डॉलर एवढे आहे.

मकाओ - मकाओ हा जगातील सर्वाधिक श्रीमंती असलेला दुसरा देश आहे. या देशातील दरडोई उत्पन्न 112,490 डॉलर एवढे आहे.

कतार - आखाती देशांमधील कतार हा जगातील सर्वाधिक श्रीमंती असलेला देश आहे. येथील दरडोई उत्पन्न तब्बल 128,703 डॉलर एवढे आहे.