F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 18:41 IST2025-08-16T18:23:44+5:302025-08-16T18:41:24+5:30

युक्रेन-रशिया थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची अलास्कामध्ये बैठक झाली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची युक्रेन-रशिया युद्ध थांबवण्यासाठी अलास्कामध्ये बैठक झाली. या बैठकीची जगभरात मोठी चर्चा झाली. जगातील दोन महासत्तांची ही बैठक इतर अनेक कारणांमुळे चर्चेचा विषय बनली.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चालीमुळे डोनाल्ड ट्रंम्प अमेरिकेतच ट्रोल झाल्याचे पाहायला मिळत आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी काल अलास्कामध्ये सामान्य प्रोटोकॉल सोडून संयुक्त पत्रकार परिषद सुरू केली. सहसा, जेव्हा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष परदेशी समकक्षांचे स्वागत करतात, तेव्हा संयुक्त पत्रकार परिषद अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या भाषणाने सुरू होते आणि त्यानंतर त्यांचे पाहुणे येतात.

पण, शुक्रवारी अलास्कातील अँकरेजमध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पत्रकार परिषद सुरू केली, त्यावेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील उपस्थित होते. संपूर्ण जगासाठी ही एक आश्चर्यकारक घटना होती. यामुळे आता अमेरिकेतच डोनाल्ड्र ट्रम्प यांना ट्रोल केलं जातंय.

अलास्कामध्ये झालेल्या बैठकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांच्यात महत्वाच्या मुद्द्यांवर एकमत झालेले नाही.

अलास्कामध्ये दोन्ही नेत्यांमधील बैठकीनंतर पुतिन यांनी दावा केला की, युक्रेनवर 'करार' झाला आहे. यासोबतच त्यांनी युरोपला प्रगतीत कोणताही अडथळा निर्माण करू नये असा इशारा दिला.

पुतिन यांच्या दाव्यानंतर ट्रम्प म्हणाले, "करार होईपर्यंत निश्चितपणे काहीही सांगता येत नाही." ट्रम्प म्हणाले की ते युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की आणि युरोपीय नेत्यांना फोन करून पुतिन आणि त्यांच्यातील संभाषणाची माहिती देतील.

या बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "आमची बैठक खूप फलदायी झाली, आम्ही अनेक मुद्द्यांवर सहमती दर्शविली, काही अजूनही आहेत. काही तितके महत्त्वाचे नाहीत. एक सर्वात महत्त्वाचा आहे आणि तोही आपण सोडवू शकतो अशी शक्यता आहे.

यावेळी, पुतिन म्हणाले की, ट्रम्प यांना समजते की रशियाचे स्वतःचे हितसंबंध आहेत. ते म्हणाले की रशिया आणि अमेरिकेने "जुना अध्याय बंद करावा आणि सहकार्याच्या मार्गावर पुढे जावे.