तुर्कीत मॉडेल्सचे बोटीवर न्यूड फोटोशूट, जनतेत प्रचंड संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 02:15 PM2021-05-06T14:15:59+5:302021-05-06T14:56:42+5:30

काही दिवसांपूर्वी दुबईतील एका बाल्कनीमध्ये न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी जवळपास १२ मॉडेल्सना मोठा वाद-विवादांचा सामना करावा लागला होता. दुबईनंतर आता तुर्कीमध्येही असेच एक प्रकरण समोर आले आहे.

सहा मॉडेल्सने तुर्कीतील बोटीवर न्यूड फोटोशूट केले आहे. स्थानिक रिपोर्टनुसार, रमजानच्या पाक महिन्यात हे फोटो समोर आल्यानंतर जनतेत प्रचंड संताप आहे.

तुर्की वृत्तपत्र लिडरच्या रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरसमुळे तुर्कीमध्ये संपूर्ण लॉकडाऊन आहे, परंतु असे असतानाही या मॉडेल्स एका लक्झरी बोटवरून गोचेक बे नावाच्या ठिकाणी जात होत्या. कारण, या मॉडेल्स एकमेकांचे न्यूड फोटो घेऊ शकतील आणि दुबईच्या स्कँडलला करता येऊ शकेल.

तुर्कीमध्ये संपूर्ण लॉकडाऊन आहे, परंतु कोरोनामुक्त असल्याचे सर्टिफिकेट दाखविले तर परदेशी पर्यटक या देशात फिरू शकतात.

दुसरीकडे, या प्रकरणी एनेस्तेसिया कशुबा या मॉडेलने असेही म्हटले आहे की, दुबई बाल्कनी स्कँडलनंतर त्या मॉडेल्स बर्‍यापैकी मथळ्यांमध्ये आल्या आणि या मॉडेल्सनाही असेच काहीतरी करायचे होते.

दरम्यान, एनेस्तेसियाने दुबईच्या न्यूड फोटोशूटमध्ये भाग घेतला आणि तिला तुर्कीच्या बोट मॉडेल्समध्ये सामील होण्याची ऑफरही मिळाली, परंतु तिने ही ऑफर नाकारली. स्थानिक मीडियाने एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये एका लक्झरी बोटमध्ये सहा मॉडेल्ससोबत दोन तरुण दिसत आहेत.

रिपोर्टनुसार, यामधील दोन मॉडेल्स टॉपलेस होत्या, तर एक मॉडेल न्यूड नग्न होती. स्थानिक मीडियानुसार, यातील एका मॉडेलचे नाव रुस्लाना कोवकोवा आहे. 21 वर्षीय या मॉडेलचे नाव जेव्हा समोर आले, तेव्हा तिने बोटमधील आपले फोटो डिलीट केले आहेत. याशिवाय, या बोटीवर युक्रेनची मॉडेल्स वेरोनिका कुर्गन, डायना पोगरेलाया आणि स्नेजहाना सुद्धा उपस्थित होत्या.

ज्युलिया वेट्रोवाने एक व्हिडिओ मेसेज जारी केला. मुस्लिम देशांमध्ये न्यूड फोटो क्लिक करणे धोक्याचे आहे, हे आता आम्ही समजू शकलो आहोत. दुबईच्या बाल्कनीमध्ये काही मॉडेल त्यांच्या न्यूड फोटोशूटमुळे बऱ्याच वादात सापडल्या, तेव्हा आम्हाला हे समजले, असे ज्युलिया वेट्रोवाने म्हटले आहे.

'मला असे वाटते की एखादी व्यक्ती स्वतःच्या चुकांमधून शिकते. मला असे वाटते की जर आपल्याला तुर्की किंवा अशा कोणत्याही मुस्लिम देशात न्यूड फोटो हवे असतील, तर आपण ते करू नये किंवा तुम्ही हे पूर्ण संरक्षणासह करावे', असेही ज्युलिया वेट्रोवाने म्हटले आहे.

Read in English