सेक्स आणि व्हाइट हाऊस: बिल क्लिंटन ते डोनाल्ड ट्रम्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 17:35 IST2018-01-25T17:32:06+5:302018-01-25T17:35:45+5:30

व्हाइट हाऊस हे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय आणि निवासस्थान. व्हाईट हाऊसच्या प्रत्येक निर्णयाकडे जगाचे लक्ष असते. कारण व्हाइट हाऊसमधून निघालेले फर्मान जागतिक राजकारणात उलथा-पालथ घडवते. पण तेच व्हाइट हाऊस पुन्हा एकदा सेक्सच्या आरोपांमुळे चर्चेत आले आहे.
दोन दशकांपूर्वी जानेवारीच्या याच आठवडयात माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी राजकीय हानी टाळण्यासाठी आपले कोणत्याही महिलेबरोबर विवाहबाह्य संबंध नसल्याचे म्हटले होते.
त्यावेळी व्हाईट हाऊसमध्ये इंटरन असलेल्या मोनिका लेविंस्कीबरोबर क्लिंटन यांचे शरीरसंबंध होते. त्यावेळी मोनिका फक्त 22 वर्षांची होती.
अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल बरोबर सेक्स संबंध ठेवल्याचा आरोप झाला आहे.
अमेरिकेन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळी नोव्हेंबर 2016 मध्ये तोंड बंद ठेवण्यासाठी स्टॉर्मीला पैसे दण्यात आले होते.
स्टॉर्मीचे तोंड बंद ठेवण्यासाठी ट्रम्प यांनी 1 लाख 30 हजार डॉलर मोजल्याचा आरोप वॉल स्ट्रीट जनरलने केला आहे.