शांघाईमध्ये 'रामजीका दरबार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 20:19 IST2018-03-31T20:19:49+5:302018-03-31T20:19:49+5:30

चीनची आर्थिक राजधानी असलेल्या शांघाईमधील अमित आणि अपर्णा वाईकर यांच्या घरी रामनवमीचा उत्सव पार पडला.

ह्या उत्सवाच्या निमित्ताने मुकेश शर्मा ह्यांच्या दिग्दर्शनाखाली रामलीला साजरी करण्यात आली.

तुलसीदासांच्या रामचरितमानस, मराठी गीत रामायणातली काही अत्यंत मधुर गाणी आणि अवधी लोकसंगीत ह्याचा समावेश ह्या रामलीलेत होता

आपल्या देशापासून दूर राहून सुद्धा १००-१२५ लोक उपस्थित होते. आणि सगळेच जण शेवटी भावुक झाले होते .