टॉपलेस फोटो पोस्टमुळे वादात सापडली होती २७ वर्षीय पॉर्न स्टार, घरात आढळून आला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 04:43 PM2021-06-12T16:43:27+5:302021-06-12T16:48:57+5:30

स्कायने काही दिवसांपूर्वीच जॉर्ज फ्लॉयडच्या फोटोजवळ टॉपलेस पोज दिली होती. ज्यावरून सोशल मीडियावर चांगलाच वाद पेटला होता. इतकंच नाही तर तिला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती.

300 पेक्षा अधिक पॉर्न सिनेमांमध्ये काम करणारी डकोटा स्काय हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. २७ वर्षीय डकोटाचा मृतदेह तिच्या घरात आढळून आला. तिचा पती जेव्हा घरी पोहोचला तेव्हा या घटनेचा खुलासा झाला. पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे. मिररच्या वेबसाइटनुसार, टॉपलेस पोज दिल्यावर वाद सापडलेल्या पॉर्न स्टारच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

लॉस एंजलिस येथील घरात डकोटा स्कायचा मृतदेह आढळून आला. डकोटा स्कायचं खरं नाव लॉरेन केय स्कॉट होतं. डकोटाच्या पतीने पोलिसांना याचा माहिती दिली. डकोटाच्या मृत्यूचं कारण अजून स्पष्ट झालं नाही. रिपोर्टनुसार, तिच्या खाजगी जीवनात काही अडचणी सुरू होत्या.

स्कायने काही दिवसांपूर्वीच जॉर्ज फ्लॉयडच्या फोटोजवळ टॉपलेस पोज दिली होती. ज्यावरून सोशल मीडियावर चांगलाच वाद पेटला होता. इतकंच नाही तर तिला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती.

ऑनलाइन ट्रोलमुळे ती चांगलीच निराश झाली होती. त्यानंतर ती जॉर्ज फ्लॉयडच्या फोटोसमोर कॅमेराला फ्लॅश करताना दिसली होती. जॉर्ज फ्लॉयडला गेल्यावर्षी पोलिसांनी जीवे मारलं होतं. ज्यानंतर सोशल मीडियात ही चर्चा चांगलीच रंगली होती.

मूळची टॅम्पा बे फ्लोरिडाची राहणारी पॉर्न स्टारने ४ मे रोजी आक्षेपार्ह फोटो कॅप्शनसोबत शेअऱ केला होता. 'जॉर्ज फ्लॉयड दिवसाच्या शुभेच्छा. सर्वांना समानता आणि निष्पक्षतेचा अधिकार आहे'. असं कॅप्शन तिने दिलं होतं.

पण या फोटोवर तिला खूप शिव्या पडल्या. या फोटोचा आणि जॉर्ज फ्लॉयडचा काय संबंध? असा प्रश्नाही तिला विचारण्यात आला.

स्कॉयने ३०० पेक्षा जास्त पॉर्न सिनेमात काम केलं आणि २०१५ मध्ये तिला AVN अवॉर्ड्सचं सर्वोत्कृष्ट न्यू स्टारलेटचं नामांकन मिळालं होतं. या अवॉर्डला पॉर्न इंडस्ट्रीतील ऑस्कर मानलं जातं.

स्कॉयची नातेवाईक महिलेने सांगितलं की, स्कॉटला मद्यसेवन आणि फेंटेनाइलची सवय लागली होती.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Read in English