Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 15:35 IST2025-11-09T15:32:04+5:302025-11-09T15:35:13+5:30

Miss Universe 2025 India:

थायलंडमध्ये आयोजित 'मिस युनिव्हर्स २०२५' सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मनिका विश्वकर्मा सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या फॅशन सेन्समुळे चर्चेत आहेत.

ऑगस्ट २०२५ मध्ये 'मिस युनिव्हर्स इंडिया'चा ताज जिंकलेल्या राजस्थानच्या मनिकाने आपल्या एका खास लूकने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

मनिका विश्वकर्मा यांनी बँकॉक येथील एका मिस युनिव्हर्स इव्हेंटदरम्यान अनारकली कुर्ता सेट परिधान केला होता.

त्यांनी घातलेला हा अनारकली सूट हेवी गोल्ड वर्क आणि सीक्विन डिटेलिंगने सजलेला होता. या पारंपारिक पोषाखावर त्यांनी नक्षीकाम केलेली मॅचिंग ओढणी घेतली होती.

या 'देसी' लूकमुळे मनिका यांनी केवळ भारतीय संस्कृतीची समृद्धता जगासमोर मांडली नाही, तर त्यांच्या फॅशनची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी प्रशंसा होत आहे.

विवादग्रस्त ठरलेल्या मिस युनिव्हर्स २०२५ स्पर्धेचा समारोप २१ नोव्हेंबर रोजी होणार आहे. डेन्मार्कची विद्यमान मिस युनिव्हर्स २०२४ व्हिक्टोरिया थीलविग यावेळी विजेत्या सौंदर्यवतीला मुकुट परिधान करेल.

मनिका विश्वकर्मा यांनी आतापर्यंतच्या सर्व इव्हेंट्समध्ये आपल्या आकर्षक पेहरावाद्वारे भारताची समृद्ध सांस्कृतिक आणि वारसा अत्यंत प्रभावीपणे सादर केला आहे.