जपानला 'हगीबिस' चक्रीवादळाचा तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 04:05 PM2019-10-14T16:05:25+5:302019-10-14T16:10:32+5:30

जपानला 'हगीबिस' चक्रीवादळाचा तडाखा बसला असून, या वादळामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे.

जपानमधील हे सर्वांत शक्तिशाली वादळ असल्याची माहिती मिळत आहे. तुफान पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा तडाखा जपानच्या अनेक भागांना बसला आहे. पुराचे पाणी नागरी वस्त्यांत शिरले आहे.

यामध्ये 33 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 60 वर्षातील जपानमधील हे सर्वांत शक्तिशाली वादळ असल्याची माहिती मिळत आहे.

आतापर्यंत 73 लाख नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. सार्वजनिक ठिकाणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

महापुरामुळे जपानमधील बुलेट ट्रेनचा मार्गही पाण्याखाली गेला आहे.

पुरात अडकलेल्या लोकांच्या बचावासाठी लष्कर, अग्निशमन, आपत्ती निवारण पथकासह 1 लाख सुरक्षा कर्मचारी मदत आणि बचाव कार्य करत आहेत.

महापुरामुळे जपानमध्ये निर्माण झालेली भीषण स्थिती