By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 08:50 IST
1 / 9पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमावादाने आता भीषण युद्धाचे रूप घेतले आहे. पाकिस्तानने 'ऑपरेशन गजब लिल हक' अंतर्गत अफगाणिस्तानच्या प्रमुख शहरांवर एअर स्ट्राईक केले आहेत, तर तालिबाननेही १५ पाकिस्तानी चौक्या ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. 2 / 9या 'ओपन वॉर'च्या पार्श्वभूमीवर, दोन्ही देशांच्या लष्करी ताकदीची तुलना केल्यास एकीकडे जगातील १४ व्या क्रमांकाची शक्तिशाली सेना (पाकिस्तान) आहे, तर दुसरीकडे लढवय्यांचा अनुभव असलेला तालिबान आहे.3 / 9२०२६ च्या 'ग्लोबल फायरपॉवर' रँकिंगनुसार पाकिस्तान जगातील १४ वी सर्वात मोठी लष्करी शक्ती आहे. सुमारे ६.५ लाख सक्रिय सैनिक आणि ५.५ लाख रिझर्व्ह फोर्स आहे. ४६० हून अधिक लढाऊ विमाने (F-16, JF-17, मिराज). अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक करण्यासाठी हेच पाकिस्तानचे मुख्य शस्त्र ठरत आहे. 4 / 9१७० हून अधिक अण्वस्त्रांसह पाकिस्तान एक घोषित अण्वस्त्रधारी देश आहे. १८०० हून अधिक रणगाडे आणि ६००० हून अधिक चिलखती वाहने आहेत. 5 / 9दुसरीकडे अफगाणिस्तानकडे यापैकी फार काही नाहीय. परंतू, तालिबानचे सैन्य हे पारंपरिक लष्करापेक्षा 'विद्रोही लढवय्यांचे' अधिक आहे. अफगाणिस्तानकडे अंदाजे १.७ लाख ते २ लाख सक्रिय लढवय्ये आहेत. 6 / 9तालिबानकडे सक्रिय फायटर जेट्स नाहीत. त्यांच्याकडे रशियन बनावटीची काही हेलिकॉप्टर्स आणि अमेरिकेने मागे सोडलेली काही विमाने आहेत, परंतु त्यांचा वापर मर्यादित आहे.7 / 9कठीण डोंगररांगा आणि दुर्गम भागात युद्ध करण्याचा तालिबानचा अनुभव अफाट आहे. त्यांनी सोव्हिएत युनियन आणि अमेरिकेसारख्या महासत्तांनाही याच जोरावर थकवले होते.8 / 9२०२१ मध्ये अमेरिकेने मागे सोडलेली हजारो ह्युमवी गाड्या, एम-१६ रायफल्स आणि आधुनिक लष्करी उपकरणे आता तालिबानच्या हाती आहेत.9 / 9पारंपरिक युद्धात पाकिस्तानचे तंत्रज्ञान आणि हवाई दल तालिबानवर भारी पडू शकते. मात्र, जर हे युद्ध प्रदीर्घ काळ खेचले गेले आणि भू-भागावर लढले गेले, तर तालिबानचा गनिमी कावा पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरू शकतो.