पाकिस्तानी हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी चीनची पडद्यामागून मोठी खेळी; भारतासाठी नवं आव्हान?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 18:13 IST2025-06-06T18:09:45+5:302025-06-06T18:13:53+5:30

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून जोरदार मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानची बोबडी वळली. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांना टार्गेट केले. त्यात १५० हून अधिक दहशतवादी मारले गेले. भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानने केलेले हल्ले भारतीय सैन्याने यशस्वीपणे परतावून लावले
भारतासोबत या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान त्यांचे हवाई दल मजबूत करण्यासाठी पाचव्या पिढीतील स्टेल्थ फायटर जेट विमान ताफ्यात समाविष्ट करण्याची तयारी करत आहे. काही महिन्यात पाकिस्तानी एअरफोर्समध्ये शेनयांग FC 31 जायरोफाल्कन स्टेल्थ फायटर जेट विमान दाखल होईल जे PL 17 मिसाईलने लेन्स असेल.
डिफेन्सशी निगडीत JANES वेबसाईने पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. काही महिन्यात पाकिस्तानी हवाई दलात चिनी एअरक्राफ्टची डिलीवरी होईल. पाकिस्तानी वायूसेनेचे पायलट सध्या चीनमध्ये फिफ्थ जेनरेशन फायटर जेट उड्डाणाचे प्रशिक्षण घेत आहेत. भारताविरोधात पडद्यामागून चीन पाकिस्तानला रसद पुरवत आहे.
FC 31 चिनी J 35 A फिफ्थ जेनरेशन स्टेल्थ फायटर जेटचं एक्सपोर्ट व्हेरिएंट आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यान चीनने जुहाई इथल्या एअर शो मध्ये J 35 A एअरक्राफ्ट पहिल्यांदा जगासमोर आणले होते. ज्यानंतर या लढाऊ विमानाची बरीच चर्चा झाली होती. या विमानाची अमेरिकेच्या F 35 विमानासोबत तुलना होऊ लागली.
मागच्या महिन्यात आणखी एका पाकिस्तानी सरकारी अधिकाऱ्याने FC 31 बाबत महत्त्वाची माहिती दिली. हे स्टेल्थ फायटर एअरक्राफ्ट हवेतून हवेमध्ये वार करणाऱ्या चिनी मिसाईल PL 17 ने लेन्स केलेले आहे. PL 17 या मिसाईलची रेंज ४०० किमी इतकी आहे. गेल्या डिसेंबर महिन्यातच असा रिपोर्ट समोर आला होता, ज्यात २ वर्षात चीन पाकिस्तानला ४० J 35 A एअरक्राफ्ट पाठवणार आहे. पाकिस्तान ३०-३६ FC 31 एअरक्राफ्ट खरेदी करू शकतो. जे पुढील १२ ते १८ महिन्यात ६-६ च्या बॅचमधून चीनहून पाकिस्तानला येतील.
FC-31 जायरोफाल्कन लढाऊ विमान म्हणजे काय? - FC-31 जायरोफाल्कन हे चिनी कंपनी शेनयांग एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनने बनवलेले पाचव्या पिढीतील स्टील्थ लढाऊ विमान आहे. ते अमेरिकेच्या J-35 आणि J-20 ला टक्कर देण्यासाठी बनवण्यात आले आहे. त्यात स्टेल्थ डिझाइन, AESA रडार आणि अंतर्गत शस्त्रे आहेत, जी रडार पासून वाचण्यास मदत करतात.
FC-31 फायटर जेटची वैशिष्ट्ये- या लढाऊ विमानाचा वेग मॅक १.८ म्हणजेच २,२०० किमी/तास वेगाने उडण्याचा आहे. याची रेंज १,२०० किमी (हवेत इंधन भरल्यानंतर १,९०० किमी) इतकी आहे. त्यात PL-17 क्षेपणास्त्र बसवता येते, ज्याची रेंज ४०० किमी आहे आणि ते रडारला टाळून दूरवरून हल्ला करू शकते.
यात प्रत्येकी ६ बाह्य आणि अंतर्गत हार्डपॉइंट्स आहेत, ज्यामध्ये एकूण १० हजार किलो वजनाची शस्त्रे लोड करता येतात. १२ मीडियम रेंजच्या हवेतून हवेत मारा करणारी मिसाईल बसवता येतात. ८ सुपरसॉनिक हवेतून जमिनीवर हल्ला करणारे बॉम्ब आणि ५०० किलो वजनाचे ८ डिप-पेनेटेशन बॉम्ब किंवा ३० लहान बॉम्ब बसवता येतात. हे विमान २८ हजार किलो वजनासह टेकऑफ घेऊ शकते.
भारताची तयारी - भारत पाचव्या पिढीतील स्टेल्थ एअरक्राफ्टसारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी वेगाने तयारी करत आहे. संरक्षण मंत्रालयाने अलीकडेच AMCA च्या मॉडेलला मंजुरी दिली आहे. ज्याचा प्रोटोटाइप २०२६-२७ पर्यंत तयार होईल. AMCA Mk1 २०३० आणि Mk2 २०३५ पर्यंत तयार होईल.
FC 31 बाबत काही शंकाही आहे, त्यात अनेक कमतरता आहेत, जे भारतासाठी दिलासा देणारे आहे. त्याचे स्टेल्थ J 20 अथवा F 35 इतके आधुनिक नाही. पाकिस्तानी हवाई दलाला नव्या जेटला समाविष्ट करण्यासाटी लॉजिस्टिक आणि ट्रेनिंगची समस्या जाणवेल. पाकच्या बुडत्या अर्थव्यवस्थेसमोर हा महागडा प्रकल्प आव्हानात्मक आहे.