"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 23:34 IST2025-04-30T23:09:24+5:302025-04-30T23:34:45+5:30

बाबा वेंगा यांना बाल्कनचे नोस्ट्राडेमस असेही म्हटले जात होते. त्या लिहू अथवा वाचूही शकत नव्हत्या....

बाबा वेंगा यांची 2025 मध्ये महायुद्ध आणि युरोपात इस्लामचे शासन, यासंदर्भातील भविष्यवाणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बाबा वेंगा यांचे खरे नाव वेंगेलिया पांडवा गुश्तेरोवा असे होते. त्यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1911 रोजी बल्गेरियामध्ये झाला होता.

बाबा वेंगा यांच्या एका भविष्यवाणीनुसार, 2043 मध्ये युरोपीय देशांमध्ये मुस्लिमांचे राज्य असेल.

युरोपात एकूण 44 देश आहेत. यांपैकी 5 देश आधीपासूनच इस्लामिक आहेत. यात अल्बानिया, बोस्निया आणि हर्जेगोविना, कोसोवो तसेच उत्तर मॅसेडोनिया यांचा समावेश आहे.

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीने युरोपीय देशांचे टेन्शन वाढवले आहे. युरोपीय देशांमध्ये मुस्लीम लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे.

बाबा वेंगा यांच्या मते २०२५ पासून युरोपात मुस्लिमांच्या दबदब्याला सुरुवात होईल. अशा प्रकारे हळू हळू 2043 पर्यंत युरोपातील सत्येवर इस्लामचा प्रभाव वाढेल.

२०११ मध्ये सीरियामध्ये सुरू झालेल्या गृहयुद्धानंतर लाखो सीरियन आणि शेजारील देशांतील लोकांनी पळून जाऊन युरोपचा आश्रय घेतला.

बाबा वेंगा यांना बाल्कनचे नोस्ट्राडेमस असेही म्हटले जात होते. त्या लिहू अथवा वाचूही शकत नव्हत्या. त्यांच्या प्रमुख भाकितांपैकी एक म्हणजे २०२५ पासून जगात एक भयानक युद्ध सुरू होईल. हे विशेषतः मध्य पूर्वेत होईल.

युरोप खंडातील मुख्य देशांच्या यादीत फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन आणि ऑस्ट्रिया यांचा समावेश आहे.