By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 10:36 IST
1 / 7Indian killed in iran us air strike: इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध वाढत आहेत. युद्ध पेटलेले असताना मुंबईतील ३२ वर्षीय तरुणाचा एका हवाई हल्ल्यात मृत्यू झाला. दीक्षित सोळंकी असे या तरुणाचे नाव आहे. तो मुंबईतील कांदिवलीमध्ये कुटुंबीयांसोबत राहत होता.2 / 7दीक्षित सोळंकी हा एमकेडी व्योम नावाच्या एका तेल वाहून नेणाऱ्या जहाजावर ड्युटीवर होता. तो जहाजाचा चालक म्हणून सेवेत होता. १ मार्च २०२६ रोजी ओमानच्या खाडीतून जात असतानाच जहाजावर हवाई हल्ला झाला. त्याला आग लागली आणि यातच दीक्षितचा मृत्यू झाला.3 / 7रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार लंडनमध्ये मुख्यालय असलेल्या व्ही शिप्स नावाची कंपनी एमकेडी व्योम टँकर यांचे व्यवस्थापन करते. १ मार्च रोजी ओमानमधील मस्कतच्या किनाऱ्यावर तेलवाहू जहाज उभे होते. याच जहाजात दीक्षित सोळंकी ड्युटीवर होता.4 / 7व्ही शिप्सने या घटनेबद्दल दिलेल्या निवेदनात म्हटलं होतं की, '१ मार्च रोजी जेव्हा आमचे एक तेलवाहू जहाज मस्कतच्या किनाऱ्याजवळ होते. त्याचवेळी मिसाईल हल्ला केला गेला, त्यामुळे मोठा स्फोट होऊन आग लागली. यात इंजिन रुममधील चालक दलातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.'5 / 7दीक्षित सोळंकी हा मागील सहा वर्षांपासून ऑयलर म्हणून काम करत होता. १९९४ मध्ये जन्मलेला दीक्षित मूळचा दीवचा आहे. पण, मागील सात वर्षांपासून त्यांचे कुटुंब मुंबईतील कांदिवलीमध्ये राहतात.6 / 7वडील अमृतलाल आणि २८ वर्षाची बहीण यांच्यासोबत तो राहत होता. सध्या त्याची बहीण दुबईमध्ये काम करते. तर आईचे चार महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. दीक्षितचे १२वी पर्यंतचे शिक्षण मुंबईतच झाले होते. त्याने इंजिनिअरिंगचे काम सुरू केल्यानंतर नोकरी सुरू केली.7 / 7दीक्षित सोळंकीचे वडील अमृतलाल यांनी सांगितलं की, तो मागील सहा वर्षांपासून वेगवेगळ्या तेल टँकर कंपन्यांमध्ये नाविक म्हणून केले होते. मागील चार महिन्यांपासून तो व्ही शिप्स कंपनीत कंत्राटी तत्त्वावर काम करत होता.