जोजिबिनी टूंजी यंदाची ‘मिस युनिव्हर्स’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 14:54 IST2019-12-09T14:50:03+5:302019-12-09T14:54:36+5:30

अमेरिकेतील अटलांटामध्ये 68 व्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धा संपन्न झाली.
या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजी (Zozibini Tunzi) हिने ‘मिस युनिव्हर्स’च्या किताब पटकावला.
या स्पर्धेत जगभरातील 93 देशातील सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धकांना मात देत ‘मिस युनिव्हर्स’चा किताब पटकवणारी जोजिबिनी टूंजी तिसरी दक्षिण आफ्रिकन सौंदर्यवती ठरली आहे.
जोजिबिनी टूंजी हिच्या या कामगिरीमुळे जगभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दक्षिण आफ्रिकेतील टोस्लोमध्ये राहाणारी जोजिबिनी 26 वर्षांची आहे. ती उत्तम सूत्रसंचालक, गायिका म्हणून प्रसिद्ध आहे.