जपानमध्ये डोळे दिपविणारा लाइट फेस्टिव्हल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 13:46 IST2018-01-09T13:43:22+5:302018-01-09T13:46:25+5:30

लाखो लाइट्सच्या सहाय्याने डोळे दिपविणारी दृश्यनिर्मिती करणारा उत्सव सध्या जपानमध्ये सुरू झाला आहे.
हिवाळी मोसमात सुरू होणारा हा उत्सव म्हणजे 'नबाना नो सातो'. नबाना नो सातो म्हणजे, करून दाखविण्यासारखं काही.
80 लाख एलईडी लाइटच्या मदतीने जपानमधील निसर्गसौदर्याचं अनोखं दर्शन या उत्सवामध्ये घडविण्यात येतं.
कुमामोटोमधील कुमामोनचे आपल्या गावाबाबतचे स्वप्न ही यंदाच्या 'नबाना नो सातो' उत्सवाती मध्यवर्ती संकल्पना आहे.
कुवाना शहरातील नागाशिमा रिसॉर्ट येथील गार्डनमध्ये हा उत्सव साजरा होतो.