Julia Ann: "माझ्या ब्रेस्टमुळेच मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला" मॉडेल जुलिया ऐनचा दावा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 15:54 IST2026-01-21T15:51:28+5:302026-01-21T15:54:48+5:30
Canadian influencer Julia Ann Pics: कॅनडाची प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जुलिया ऐन हिच्या एका वक्तव्याने सध्या इंटरनेटवर खळबळ उडवून दिली.

कॅनडाची इन्फ्लुएन्सर जुलिया ऐन हिने केलेला दावा सध्या जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे. "माझ्या ब्रेस्टमुळे मला अमेरिकेचा व्हिसा मिळाला," असे खळबळजनक विधान जुलियाने केले आहे.

२५ वर्षीय जुलिया ऐन ही मूळची कॅनडाची असून ती एक सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर आहे. अमेरिकेने तिला 'एक्स्ट्राऑर्डिनरी अॅबिलिटी' असलेल्या श्रेणीतून O-1B व्हिसा मंजूर केला आहे.

जुलियाने व्हिसासाठी केलेल्या अर्जासोबत तिचे कागदपत्रे जोडण्याऐवजी तिचे गाजलेले सोशल मीडिया व्हिडिओ पुरावे म्हणून सादर केले होते. यामध्ये तिचे बोल्ड कपड्यांमधील व्हिडिओ आणि सँडविच खातानाचे मजेशीर व्हिडिओ समाविष्ट होते.

'टाइम्स ऑफ लंडन'शी बोलताना जुलिया म्हणाली की, "कदाचित माझी एक्स्ट्राऑर्डिनरी अॅबिलिटी हीच आहे की माझे ब्रेस्ट मोठे आहेत." तिच्या एका व्हिडिओला १.१ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाल्याने तिची मोठी फॅन फॉलोइंग सिद्ध झाली, जी व्हिसा मिळवण्यासाठी महत्त्वाची ठरली.

जुलियाने अर्जासोबत दोन डझन व्हिडिओ, फॉलोअर्सची संख्या, विविध ब्रँड्ससोबत केलेले काम आणि आर्थिक उत्पन्नाचे पुरावे जोडले होते. तिचा कंटेंट धावत्या पळत्या जगात लोकांना तणावातून मुक्त होण्यास मदत करतो, असा दावा तिने केला आहे.

तज्ञांच्या मते, जुलियासारखे क्रिएटर्स अमेरिकन अर्थव्यवस्थेत महसूल आणतात, त्यामुळे त्यांना हलक्यात घेतले जाऊ शकत नाही. हा व्हिसा तीन वर्षांसाठी दिला जातो आणि त्यानंतर तो रिन्यू करण्याची सोय असते.

















