शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

बुर्ज खलिफाला युद्धात नुकसान झालं, तर मिळेल 'एवढ्या' रकमेचा विमा; किंमत ऐकून अवाक् व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 20:52 IST

1 / 9
गेल्या काही दिवसांपासून जगात एक नवे युद्ध भडकले आहे. इस्रायलने इराणवर हल्ला चढवला आहे. त्यानंतर इराणने प्रतिहल्ला केल्यामुळे इस्रायली अमेरिकेने इराणवर सर्जिकल स्ट्राईक करण्यात सुरुवात केली आणि युद्ध सुरु झाले.
2 / 9
या युद्धाची व्याप्ती हळूहळू वाढली आणि इराणने अमेरिकेला लक्ष्य करण्यासाठी आसपासच्या देशांवर हल्ले चढवले. त्यात संयुक्त राष्ट्र अमिरातीमधील विविध शहरांना लक्ष्य केले गेले. दुबईतील बड्या इमारतींवरही हल्ले झाल्याचे व्हिडीओ दिसले.
3 / 9
दुबईतील लोकप्रिय पर्यटन स्थळांना आगी लागल्याचे दिसले, ज्यामुळे धुराचे लोट आकाशात दिसू लागले. जगप्रसिद्ध बुर्ज खलिफावर हल्ला होऊ शकतो या भीतीने खबरदारीचा उपाय म्हणून बुर्ज खलिफा रिकामा करण्यात आला होता.
4 / 9
मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि सौदी अरेबिया, दुबईमधील हल्ल्यानंतर सर्वांनाच एक प्रश्न पडला आहे, तो प्रश्न म्हणजे दुबईतील जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफाला काही झाले, तर नुकसान भरपाई मिळेल का? आणि किती मिळेल?
5 / 9
बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारतींपैकी एक असून ती लोकप्रियदेखील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुर्ज खलिफा इमारतीचा मोठ्या प्रमाणात विमा उतरवण्यात आला आहे. डेव्हलपर एमार प्रॉपर्टीजने ओमान इन्शुरन्सकडून त्याचा विमा उतरवला आहे.
6 / 9
महत्त्वाची बाब अशी की, ही विमा रक्कम थोडीथोडकी नसून, तब्बल १५० कोटी इतकी आहे. त्यातही आणखी एक प्रश्न असा आहे की, बुर्ज खलिफावर हल्ला झाल्यास हा विमा उपलब्ध होईल का? त्याचा डेव्हलपर्सना काही फायदा होऊ शकेल का?
7 / 9
बुर्ज खलिफासारख्या मेगा-इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांसाठी विमा संरक्षण सामान्य इमारतींपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. एमार डेव्हलपर्सद्वारे प्रदान केलेल्या विम्यात मालमत्ता विमा, बांधकाम जोखीम आणि राजकीय हिंसाचार यांचा समावेश असू शकतो.
8 / 9
जर बुर्ज खलिफाचे काही नुकसान झाले तर विमा कंपनीला पैसे द्यावे लागतील. पण विमा पॉलिसी अनेकदा विशिष्ट श्रेणीतील नुकसानासाठी विशिष्ट रक्कम देते. त्यामुळे ही रक्कम संपूर्ण इमारतीचे मूल्य असू शकत नाही, ठराविक मर्यादेतील रक्कम असू शकते.
9 / 9
विमा दावा नेहमीच प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे निश्चित केला जातो. जर नुकसान मर्यादित असेल तर देय प्रमाणानुसार असते. शिवाय, अनेक प्रकरणांमध्ये, वजावट लागू होते. बुर्ज खलिफाच्या बाबतीत, त्याचा विमा त्याच्या अद्वितीय संरचनेमुळे वेगळा आहे.
टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिकाwarयुद्धsaudi arabiaसौदी अरेबियाDubaiदुबई