हमासविरोधात इस्राइल खतरनाक रसायन वापरणार, भुयारात सोडताच फेस येणार, मध्ये सापडलेल्याचा दगड होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 04:39 PM2023-10-30T16:39:14+5:302023-10-30T16:43:55+5:30

Israel-Hamas war: हमासच्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून हजारो नागरिकांचा बळी घेतल्यानंतर इस्राइलने हमासचा पूर्ण बीमोड करण्यासाठी युद्ध पुकारले आहे. दरम्यान, हमासचे दहशतवादी भुयारात लपून युद्ध करत असल्याने त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इस्राइलने एक नवं हत्यार समोर आणलं आहे.

हमासच्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून हजारो नागरिकांचा बळी घेतल्यानंतर इस्राइलने हमासचा पूर्ण बीमोड करण्यासाठी युद्ध पुकारले आहे. दरम्यान, हमासचे दहशतवादी भुयारात लपून युद्ध करत असल्याने त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इस्राइलने एक नवं हत्यार समोर आणलं आहे. या बॉम्बमुळे कुठलाही स्फोट होत नाही. तसेच आवाजही येत नाही. मात्र तो जिथे फुटतो, तिथे मोठ्या प्रमाणावर फेस निर्माण होतो. त्यानंतर तो टणक बनतो. म्हणजेच हा बॉम्ब भुयारांमध्ये फुटल्यानंतर तिथल्या वाटा बंद होतील.

इस्राइल त्याच्याकडील अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसाठी ओळखला जातो. गाझापट्टीमधील हमासच्या दहशतवाद्यांच्या भुयारांमध्ये स्पॉन्ज बॉम्बचा वापर करून ते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इस्राइली डिफेन्स फोर्ससाठी सर्वात मोठं आव्हान ही भुयारं बंद करण्याचं आहे. कारण याचा फायदा उचलून हमासचे दहशतवादी फरार होत असतात.

याच भुयारांमध्ये हमासने आपली हत्यारं लपवून ठेवली आहेत. तिथूनच ते रॉकेट सोडत असतात. आता इस्राइलच्या लष्कराने प्रत्यक्ष जमिनीवरून कारवाईला सुरुवात केल्यावर हमासने जमिनीखाली खोदलेली भुयारं बंद करण्यास प्राधान्य दिलं आहे. त्यासाठी इस्राइलने स्पॉन्ज बॉम्बचा वापर करण्याची तयारी केली आहे.

स्पॉन्ज बॉम्बचा वापर पहिल्यांदाच करण्यात येत आहे. हा एक खास प्रकारचा बॉम्ब आहे. तो फुटल्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणावर फेस बाहेर येतो. हा फेस थोड्याच वेळात काँक्रिटप्रमाणे कठोर होतो. म्हणजेच हे बॉम्ब भुयारात फोडले तर त्यामुळे भुयार पूर्णपणे बंद होऊन जातं. त्यानंतर त्यातून कुणी बाहेर येऊ शकणार नाही आणि बाहेरून आत जाऊ शकणार नाही. तसेच हे कॉक्रिट तोडणं सोपं नसेल.

स्पॉन्ज बॉम्ब एका प्लॅस्टिकच्या पिशवीत असतो. त्यात दोन वेगवेगळी रसायनं असतात. हे दोन्ही रसायने एक धातूची प्लेट किंवा रॉडच्या माध्यमातून वेगळी केली जातात. जेव्हा रॉड हटवला जातो तेव्हा रसायनांची परस्पर प्रक्रिया होऊन एक फेसाळता द्रव पदार्थ तयार होतो. तो हवेच्या संपर्कात आल्यानंतर प्रचंड वेगाने पसरतो. तसेच नंतर तो टणक होत जातो. त्यामुळे जमिनीखालील भुयारं आणि बोगदे बंद करण्यासाठी तो उपयुक्त ठरतो.

इस्राइली कमांडो बोगद्यांचा शोध घेताना एकीकडून बोगद्यांमध्ये बॉम्ब फोडत जातील. त्यामुळे बोगदे बंद होत जातील. या बॉम्बमधील रसायनं खूप संवेदनशील आणि ज्वालाग्राही आहेत. मात्र फेस येऊन तो टणक झाल्यानंतर ते फोडणं कठीण आहे. त्यामुळे एकदा भुयाराता याचा स्फोट झाला ती ते पुन्हा उघडणं जवळपास अशक्य होईल.