शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इस्रायलला पाठिंबा अन् गाझाला 100 मिलियन डॉलर्सची मदत... काय आहे ज्यो बायडन यांचा प्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 11:24 PM

1 / 8
इस्रायलच्या दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी अमेरिका संपूर्ण ताकदीने इस्रायलच्या पाठिशी उभी असल्याचे म्हटले आहे. हमासची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी अमेरिकन सैन्य इस्रायलला युद्धात पूर्ण सहकार्य करेल, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
2 / 8
दरम्यान, गाझामधील रुग्णालयावरील हल्ल्यामुळे बदललेल्या भू-राजकीय परिस्थितीत अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी गाझा आणि वेस्ट बँकमध्ये राहणाऱ्या लाखो पॅलेस्टिनींना मदत म्हणजेच मानवतावादी मदतीसाठी युद्ध प्रभावित क्षेत्रात 100 मिलियन डॉलर्सचे मदत पॅकेज जाहीर केले आहे.
3 / 8
इस्रायलच्या भेटीदरम्यान ज्यो बायडन यांनी अनेक वेळा पुनरुच्चार केला की, जो कोणी हमासला मदत करेल त्याला परिणाम भोगावे लागतील. या युद्धात अमेरिका सर्व बाजूंनी इस्रायलच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे, असेही ते म्हणाले.
4 / 8
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धातदरम्यान अडकलेल्या गाझा आणि वेस्ट बँकमधील निरपराध लोकांच्या स्थितीवर चिंता व्यक्त करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले, 'हमासच्या दहशतवाद्यांनी गाझामधील लोकांचे मदत पॅकेज लुटण्याचा प्रयत्न केला तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील.
5 / 8
हमास पॅलेस्टिनी लोकांसाठीचे मदत पॅकेज हडप करू शकत नाही. हमासच्या या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय समुदायाला गाझा आणि वेस्ट बँकमधील लोकांना मदत करण्यापासून रोखू शकते, असे ज्यो बायडन म्हणाले. तेल अवीवमध्ये पत्रकारांना संबोधित करताना ज्यो बायडन म्हणाले, 'गाझातील लोकांना अन्न, पाणी, औषध आणि निवारा हवा आहे.
6 / 8
आज, मी इस्रायली मंत्रिमंडळाला गाझामधील नागरिकांना जीवन वाचवणारी मानवतावादी मदत देण्यास सहमती देण्यास सांगितले आहे, कारण हे नागरिक मदतीस पात्र आहेत, हमास नाही. तर इजिप्तमधून गाझापर्यंत मानवतावादी मदत सुरू होऊ शकते, असे इस्रायलने मान्य केले आहे.
7 / 8
दरम्यान, ज्यो बायडन म्हणाले की, 'गाझा येथील रुग्णालयावर काल झालेल्या हल्ल्याने मला खूप दु:ख झाले आहे. हा हल्ला पाहून मला खूप राग आणि दु:ख झाले आहे. हा हल्ला इस्रायलने केलेला नाही, असे मला वाटते.
8 / 8
हमास या दहशतवादी संघटनेने 31 अमेरिकन नागरिकांसह 1300 हून अधिक लोकांची हत्या केली आहे. तसेच, त्यांनी लहान मुलांसह अनेकांना ओलीस ठेवले आहे. त्यांनी ISIS पेक्षाही भयंकर अत्याचार केले आहेत.
टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनIsraelइस्रायलIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धGaza Attackगाझा अटॅकPalestineपॅलेस्टाइनAmericaअमेरिका