शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोबाईल ऐवजी लँडलाईनचा वापर… हमासच्या २ वर्षांच्या प्लॅनिंगसमोर मोसाद ठरले अपयशी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 1:46 PM

1 / 12
नवी दिल्ली : ७ ऑक्‍टोबरला हमासने ज्या प्रकारे इस्रायलमध्ये घुसून हल्ला केला, त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. जगातील सर्वोत्तम गुप्तचर संस्था समजल्या जाणाऱ्या सीआयए आणि मोसाद यांनाही या हल्ल्याची माहिती नव्हती.
2 / 12
आता समोर येत असलेल्या माहितीनुसार, हमासने इस्रायली गुप्तचरांना टाळण्यासाठी मोबाईल फोन आणि कॉम्प्युटरचा वापर करणे टाळले आणि दोन वर्षे एका छोट्या सेलमध्ये हल्ल्याची तयारी केली.
3 / 12
हमासने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर केलेल्या हल्ल्याची तयारी कशी केली आणि यासंदर्भातील माहिती इस्रायलपासून कशी लपवून ठेवली, याची नवी माहिती समोर आली आहे.
4 / 12
रिपोर्टनुसार, इस्रायलवरील हल्ल्याची योजना दोन वर्षे चालली आणि दहशतवादी संघटनेच्या एका लहान सेलद्वारे केली गेली, ज्यांनी गाझा पट्टीतील हमासच्या बोगद्यांच्या विस्तृत नेटवर्कमध्ये स्थापित टेलिफोन लाईन्सद्वारे एकमेकांशी संवाद साधला. या बोगद्यांना 'मेट्रो ऑफ गाझा' असेही म्हणतात.
5 / 12
रिपोर्ट्सनुसार, हमासने कॉम्प्युटर आणि संपर्काची इतर साधने, जसे की मोबाईल फोन, इस्त्रायली इंटेलिजन्सद्वारे अधिक सहजपणे ट्रॅक करता येऊ शकतात, ते टाळण्याची खात्री केली. हा रिपोर्ट इस्रायलने अमेरिकेला पुरवलेल्या गुप्तचर माहितीच्या दोन स्त्रोतांवर आधारित आहे.
6 / 12
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, दहशतवादी हल्ल्याच्या तयारीसाठी जबाबदार असलेल्या युनिटच्या घडामोडी इस्त्रायलवरील हल्ल्यात भाग घेतलेल्या बहुतेक लोकांपासूनही गुप्त ठेवण्यात आल्या होत्या. त्या दहशतवाद्यांना हमासकडून विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात असले तरी, हा हल्ला करण्याच्या काही दिवस आधी त्यांना या विशिष्ट योजनेची माहिती देण्यात आली होती.
7 / 12
हमास दहशतवाद्यांकडून इस्रायली गुप्तचर संस्थेपासून बचाव करण्यासाठी जुन्या संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. गेल्या जुलैमध्ये जेनिन निर्वासित शिबिरातील 'होम अँड गार्डन' ऑपरेशनमध्ये देखील त्याचा वापर करण्यात आला होता.
8 / 12
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्वासित शिबिरावर सैन्याच्या छाप्यात क्लोज-सर्किट पाळत ठेवणाऱ्या कॅमेऱ्यांचे जाळे उघडकीस आले, जे सुरक्षित फोन लाइन्स व्यतिरिक्त सुरक्षा दलांच्या हालचालींची पूर्वसूचना देण्यासाठी डिझाइन केलेले होते.
9 / 12
मोसादला चकमा देण्यासाठी हमास आणि पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद यांनी इस्त्रायली वस्त्यांवर वारंवार छोटे-मोठे हल्ले केले आणि त्यांचे प्रशिक्षण लपवून ठेवले नाही, पण इस्रायलने ते गांभीर्याने घेतले नाही. यासोबतच आयडीएफ हमासच्या दहशतवाद्यांजवळ कसे काम करते? याबाबतही संपूर्ण माहिती होती.
10 / 12
हमासला माहित होते की, विशिष्ट लष्करी तुकड्या कुठे तैनात आहेत आणि हल्ला सुरू झाल्यास त्यांना मदत करण्यासाठी किती वेळ लागेल? हमासच्या दहशतवाद्यांना कम्युनिकेशन सर्व्हर कुठे आहेत? हे माहीत होते आणि त्यांनी ते नष्ट केले. यानंतर मदतीसाठी कॉल करणे आणि त्वरित प्रतिसाद देणे खूप कठीण झाले.
11 / 12
इस्रायलने अमेरिकेसोबत शेअर केलेल्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, हमासने व्यक्तिशः नियोजन बैठका आयोजित करून आणि डिजिटल संप्रेषण टाळून, सीमेपलीकडे किमान १५०० सैनिक पाठवून जुन्या पद्धतीच्या गुप्तचर उपायांद्वारे ऑपरेशन केले.
12 / 12
हमासने इस्रायलमध्ये प्रवेश केला आणि जवळपास १४०० इस्रायली नागरिकांना ठार केले. यासोबतच इराणने गेल्या काही वर्षांत हमासला ऑपरेशनल सुरक्षा रणनीती विकसित करण्यात मदत केली आहे.
टॅग्स :Israelइस्रायलIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धPalestineपॅलेस्टाइनGaza Attackगाझा अटॅक