Iceland च्या ज्वालामुखीनं उघडला पृथ्वीचा दरवाजा; हे फोटो एकटक पाहातच राहाल...!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 02:43 PM2022-08-07T14:43:21+5:302022-08-07T14:48:19+5:30

आइसलँडची (Iceland) राजधानी रेकजाविकमध्ये (Reykjavik) गेल्या वर्षी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या ठिकाणी आता पुन्हा एकदा लाव्हारस बाहेर पडताना दिसत आहे. फागराडाल्सफाल माऊंटेनवर (Fagradalsfjall Mountain) असलेला हा ज्वालामुखी सध्या पर्यटनाचं केंद्र बनला आहे. लाव्हा पाहण्यासाठी दूरदूरहून पर्यटक येत आहेत. तसंच शास्त्रज्ञांनीही या उद्रेकामुळे पृथ्वीचा दरवाजा उघडला असल्याचं म्हटलं आहे. जमिनीखालील रहस्याचं संशोधन यातून करता येणार आहे.

आइसलँडची (Iceland) राजधानी रेकजाविकमध्ये (Reykjavik) गेल्या वर्षी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या ठिकाणी आता पुन्हा एकदा लाव्हारस बाहेर पडताना दिसत आहे. फागराडाल्सफाल माऊंटेनवर (Fagradalsfjall Mountain) असलेला हा ज्वालामुखी सध्या पर्यटनाचं केंद्र बनला आहे. लाव्हा पाहण्यासाठी दूरदूरहून पर्यटक येत आहेत. तसंच शास्त्रज्ञांनीही या उद्रेकामुळे पृथ्वीचा दरवाजा उघडला असल्याचं म्हटलं आहे. जमिनीखालील रहस्याचं संशोधन यातून करता येणार आहे.

ज्वालामुखी रेकजाविक हा केफ्लाविक एअरपोर्टपासून केवळ ३२ किमी अंतरावर आहे. प्रत्येक विमान टेकऑफ आणि लँडिंग करताना लोकांना याच ठिकाणाहून फिरवून नेलं जात आहे. सोशल मीडियावरही या ज्वालामुखीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. फोटो जितके सुंदर आहेत तितकेच भयावह देखील आहेत. याआधी ज्वालामुखी केवळ एका जागी उद्रेक होत होता आणि आतातर अनेक ठिकाणी याचा प्रसार झाला आहे. वेगवेगळ्या ठिकाणातून लाव्हा बाहेर पडत आहे. एखाद्या कारंज्याप्रमाणं याला रुप प्राप्त झालं आहे. (फोटो- रॉयटर्स)

ज्वालामुखी मधून निघणाऱ्या लाव्हा आणि धुरामुळे ढग जमा झाले आहेत. पण अद्याप तरी याचा विमान प्रवासावर कोणताही परिणाम झालेला नाही. विमानतळ सुरू आहे. हा ज्वालामुखी चार दिवसांपूर्वी भूकंपाच्या सौम्य स्वरुपाच्या धक्क्यांनंतर उद्रेक झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत लाव्हारसाची नदीच वाहू लागली आहे. गेल्यावर्षी ज्या ठिकाणी उद्रेक झाला होता. त्याच ठिकाणावर आणि जवळपास उद्रेक होत आहे. गेल्या वर्षी देखील काही महिन्यांपर्यंत लाव्हाचा उद्रेक होत होता. (फोटो- गेटी)

आईसलँड उत्तर अटलांटिकमधील ज्वालामुखीच्या वरच्या बाजूला वसलेलं आहे. त्यामुळे याठिकाणी दर चार ते पाच वर्षांनी मोठ्या प्रमाणावर विस्फोट होत राहातो. सर्वात मोठा उद्रेक २०१० साली झाला होता. हा उद्रेक Eyjafjallajokull Volcano मध्ये झाला होता. यामुळे निर्माण झालेल्या धुराचे लोट अगदी वायुमंडळापर्यंत पोहोचले होते. तसंच युरोप आणि उत्तर अमेरिकेच्या दिशेनं जाणारी सर्व विमान उड्डाण देखील रद्द करण्यात आली होती. (रॉयटर्स)

Eyjafjallajokull Volcano मुळे १ लाख विमान उड्डाणं रद्द झाली होती. कोट्यवधी प्रवासी वेगवेगळ्या विमानतळावर अडकले होते. पण यावेळीच्या उद्रेकामुळे सध्यातरी असं कोणतंही संकट निर्माण झालेलं नाही. पर्यटकांशिवाय इथं अनेक देशांचे वैज्ञानिक देखील जमा झाले आहेत. लाव्हाचे सॅम्पल परिक्षणासाठी पाठवण्यात आले आहेत. सातत्यानं बुडबुड्यांसारखा लाव्हारसाचा उद्रेक होत आहे. तसंच गॅसची दुर्गंधी पसरत आहे. (फोटो- गेटी)

ज्वालामुखीचा लोकांना धोका खूप कमी आहे असा दावा स्थानिक प्रशासनानं केला आहे. या परिसरात आजूबाजूला कुणीच राहत नाही. नागरी वस्ती ज्वालामुखीपासून खूप दूर आहे. तसंच ज्वालामुखीच्या जवळ जाऊ नका असा वारंवार इशारा देखील स्थानिक प्रशासनाकडून दिला जात आहे. तसंच कोणत्याही प्रकारचा अतातायीपणा करू नका असंही सांगण्यात येत आहे. तरीही गेल्या काही दिवसांत नको ते धाडस केल्यामुळे तीन पर्यटनक जखमी झाले आहेत. इथं केवळ तप्त लाव्हा किंवा दगडांचा धोका नाही, तर अचानक विस्फोट होणाऱ्या गॅसचा देखील धोका आहे. (फोटो- रॉयटर्स)

आइसलँडच्या पंतप्रधान कॅटरीन जॅकबस्डोटीर यांनीही या ठिकाणी वारंवार छोटे-छोटे भूकंप होत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे हा ज्वालामुखी शांत होण्याची कोणतीही शक्यता नाही. एक दिवस मोठ्या प्रमाणात याचा उद्रेक होऊ शकतो असाही धोका त्यांनी व्यक्त केला आहे. अचानक होणाऱ्या उद्रेकाची आधीच भविष्यवाणी करणं शक्य नाही. पण आमचे वैज्ञानिक या परिस्थितीवर अतिशय जवळून लक्ष ठेवून आहेत, असंही त्यांनी म्हटलं. (फोटो- रॉयटर्स)

Fagradalsfjall Mountain वर असलेला ज्वालामुखी फुटताच याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. यानंतर याठिकाणी पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. कोरोना काळात पर्यटनाला झटका बसला होता. पण आता पुन्हा एकदा सुधारणा झाली आहे. विमान कंपन्या आता विमानांची उड्डाणं या परिसराजवळून करत आहेत. जेणेकरुन प्रवाशांना ज्वालामुखी पाहता येईल. (फोटो- एपी)

आइसलँडला आग आणि बर्फाचा देश म्हणून ओळखलं जातं. इथं लोक ग्लेशियर, ज्वालामुखी पाहायला येतात. लोक या ज्वालामुखीला टूरिस्ट ज्वालामुखी देखील बोलू लागले आहेत. लाव्हाचा विस्फोट वेगानं आणि भयानक स्वरुपाचा नाही. त्यामुळे लोक रस्त्याच्या कडेला उभं राहून ज्वालामुखीचा उद्रेक पाहतात. तसंच काही लोक ट्रेकिंग करतही या ठिकाणावर पोहोचत आहेत.