आइसलॅंडच्या या ज्वालामुखीमध्ये सहा हजार वर्षांनी झाला उद्रेक, बघा खास फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 11:29 AM2021-03-22T11:29:10+5:302021-03-22T11:37:55+5:30

Iceland Volcano Erupts : इथे ७८१ वर्षांनंतर पहिल्यांदा अशी घटना घडली. ज्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे त्यात गेल्या सहा हजार वर्षात कधीही विस्फोट झाला नव्हता.

सहा हजार वर्षात पहिल्यांदाच आइसलॅंडमधील एक ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. हा ज्वालामुखी आइसलॅंडची राजधानी रेक्याविकपासून साधारण ३२ किमी अंतरावर फगराडल्स डोंगरावर आहे.

असोसिएटेड प्रेसच्या रिपोर्टनुसार, शुक्रवारी रात्री ८.४५ वाजता ज्वालामुखीतून लाव्हारस बाहेर येऊ लागला होता. रेक्याविक क्षेत्रात ज्वालामुखीचा उद्रेक होणं सामान्य बाब नाही. इथे ७८१ वर्षांनंतर पहिल्यांदा अशी घटना घडली. ज्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे त्यात गेल्या सहा हजार वर्षात कधीही विस्फोट झाला नव्हता.

आइसलॅंडच्या हवामान खात्याने सांगितले की, ज्वालामुखीत झालेला उद्रेक छोटा आहे आणि स्थानिक लोकांनी आपली घरे सोडण्याची गरज नाही. या ज्वालामुखीपासून १० किलोमीटर अंतरावर घरे आहेत.