Florida School Shooting : अमेरिकेत माजी विद्यार्थ्याकडून शाळेत गोळीबार, 17 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 11:14 IST2018-02-15T10:56:11+5:302018-02-15T11:14:22+5:30

अमेरिकेतील फ्लोरिडामधील पार्कलँड येथील शाळेत एका माजी विद्यार्थ्यांने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 17 जणांचा मृत्यू झाला आहे तर 20 हून अधिक जण जखमी झालेत.
स्टोनमॅन डगलस या शाळेमध्ये माजी विद्यार्थ्यानं बुधवारी ( 14 फेब्रुवारी ) गोळीबार केला.
निकोलस क्रूझ (वय 19) असे गोळीबार करण्याचे नाव आहे. क्रूझ हा शाळेचा माजी विद्यार्थी असून त्याला शाळेतून काढण्यात आले होते.
निकोलस शाळेत घुसून फायर अलार्म वाजवला आणि अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली.
यावेळी, अनेक मुले जीव वाचवण्यासाठी शाळेतील वर्गांमध्ये लपून बसले. दरम्यान, पोलिसांनी हल्लेखोर निकोलसला ताब्यात घेतले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरच्या माध्यमातून या हल्ल्याचा निषेध केला आहे.