तैवानमध्ये जबरदस्त भूकंप, 219 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 18:07 IST2018-02-07T18:05:14+5:302018-02-07T18:07:00+5:30

तैवानच्या हुआलीन शहरात आलेल्या जबरदस्त भुकंपामुळे दोघांचा मृत्यू झाला असून हजारो लोक जखमी झाले आहेत.
सरकारकरडून 219 लोक जखमी झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
भारतीय वेळेनुसार मंगळवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास भूकंप आला असून 150 जण बेपत्ता आहेत.
भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपानंतर अनेक ठिकाणी इमारती कोसळल्या असून बचावकार्य सुरु आहे.
हुआलिनची लोकसंख्या एक लाख आहे. भूकंपानंतर जवळपास 40 हजार घरांमध्ये पाणी आणि वीजेची समस्या निर्माण झाली आहे.