सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 18:46 IST2025-10-11T18:38:07+5:302025-10-11T18:46:41+5:30
World’s most valuable gold dress sets: हा जो ड्रेस तुम्ही बघत आहात, तो सोन्यापासून तयार करण्यात आला आहे. या ड्रेसला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळाले आहे. त्याची किंमत किती आणि त्यासाठी किती सोनं लागलं?

जगातील सर्वात मौल्यवान सोन्यापासून बनवलेल्या ड्रेसची सध्या चर्चा सुरू आहे. या खास ड्रेसने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये जगातील सर्वात महागडा सोन्याचा ड्रेस म्हणून नवा विक्रम केला आहे.
हा ड्रेस खूप महागडा आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे तो सोन्यापासून तयार करण्यात आला आहे. सोन्यापासून तयार करण्यात आलेल्या ड्रेसची किंमत १,०८८,००० अमेरिकन डॉलर डॉलर (म्हणजे सुमारे १ दशलक्ष डॉलरहून अधिक) इतकी आहे.
भारतीय चलनामध्ये त्याची किंमत ९ कोटी ६५ लाखांपेक्षा जास्त आहे. हा ड्रेस २१ कॅरेट सोन्याचा वापर करून बनवला गेला आहे.
दुबईतील प्रसिद्ध ज्वेलरी ब्रॅण्ड असलेल्या अल रोमाईजानमध्ये हा ड्रेस तयार करण्यात आला आहे. हा ड्रेस फॅशन म्हणूनच नाही तर कला आणि पारंपरित अमिरातीच संस्कृती यांचा संगम आहे.
केवळ ड्रेसचे वजन १,२७०.५ ग्रॅम आहे. त्यासोबत एक मुकुट, पारंपरिक हेअरड्रेस आणि कानातले यांचाही समावेश आहे. ड्रेससह या संपूर्ण सेटचे एकूण वजन १० किलोपेक्षा जास्त आहे.
हा ड्रेस गिनीज बुक ऑफ रेकॉर्डच्या प्रमाणपत्रासह आता ज्वेलर्समध्ये ठेवण्यात आला आहे. मॉडेलने जेव्हा हा सोन्याचा ड्रेस घालून वॉक केला, ते पाहून बघणारे थक्क झाले.