या देशात तारुण्यही साजरं करतात जल्लोषात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 22:15 IST2018-01-08T22:09:00+5:302018-01-08T22:15:46+5:30

जपानमध्ये दरवर्षी 'कमिंग ऑफ एज डे' साजरा करण्यात येतो. तरुण-तरुणी 20 वर्षांचे झाल्यानंतर या कार्यक्रमात सहभाग घेतात.
जपानमध्ये प्रत्येक वर्षी कोणत्याही तरुण-तरुणीचा 20वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
विशेष म्हणजे याचा जल्लोष घरात नव्हे, तर रस्त्यावर केला जातो. 'कमिंग ऑफ एज डे' हा कार्यक्रम जपानमधल्या सरकारी कार्यालयातही आयोजित केला जातो.
काही जण कार्यक्रमानंतर घरांमध्ये पार्टीही साजरी करतात. कमिंग ऑफ एज डे जपानमध्ये 69 वर्षांपासून साजरा केला जातो.
पहिल्यांचा 1948साली या डे सेलिब्रेट करण्याची प्रथा पडली होती. त्यावेळी अनेकांना रजाही देण्यात आली होती.