Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 13:27 IST2025-07-14T13:24:19+5:302025-07-14T13:27:53+5:30

नद्या केवळ निसर्गाचं सौंदर्यच वाढवत नाही तर, मनुष्याची तहान देखील भागवतात. पण, या जगात असे ६ देश आहेत, जिथे एकही नदी नाही.

नद्या केवळ निसर्गाचं सौंदर्यच वाढवत नाही तर, मनुष्याची तहान देखील भागवतात. पण, या जगात असे ६ देश आहेत, जिथे एकही नदी नाही.

कुवेत : मध्य पूर्वेकडील देश कुवेतमध्ये एकही नदी नाही. या देशातील लोकांची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी खाऱ्या समुद्राचे पाणी गोड केले जाते. यासाठी 'डिसॅलिनेशन प्लांट'चा वापर केला जातो.

ओमान : ओमानमध्येही एकही नदी नाही. मात्र, या देशात काही कृत्रिम तलाव आहेत. नदीची कोरडी पात्र भासवीत अशी तलावं पावसाळ्यात पाण्याने भरतात. पाणी भरताच, ती अगदी नैसर्गिक नदीसारखी दिसू लागतात.

सौदी अरेबिया : सौदी अरेबियामध्येही नदी नाही. येथील लोक पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी भूगर्भात साठवलेल्या पाण्याचा वापर करतात. याशिवाय, येथील डिसॅलिनेशन प्लांटद्वारे खारे समुद्राचे पाणी पिण्यायोग्य बनवून ते वापरतात.

युएई : संयुक्त अरब अमिरातीमध्येही नदी नाही. ओमानप्रमाणे येथेही काही दऱ्या आहेत, ज्यामध्ये पावसाळ्यात पाणी साचते. पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी युएई देखील डिसॅलिनेशनचा वापर करते.

बहरीन : पर्शियन आखातात वसलेल्या या छोट्याशा देशात एकही नदी नाही. पावसाळ्यात येथे काही लहान तलाव तयार होतात, जी काही दिवसातच सुकून जातात. येथील लोक पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी इतर मार्गांवर अवलंबून आहेत.

माल्ता : माल्टामध्ये कायमस्वरूपी नदी नाही. येथे मुसळधार पाऊस पडतो, तेव्हा काही लहान नद्या तयार होतात, परंतु त्या देखील जास्त काळ टिकत नाहीत. येथील लोक त्यांच्या पाण्याच्या गरजांसाठी भूगर्भातील पाण्यावर अवलंबून असतात.