शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : WHO कोरोनाचं उगमस्थान शोधणार, पुढच्या आठवड्यात एक टीम चीनला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 4:06 PM

1 / 12
जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल एक कोटींवर पोहचली असून तब्बल पाच लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.
2 / 12
जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 10,429,924 वर गेली असून 508,637 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर आतापर्यंत 5,689,224 लोकांनी कोरोनावर मात केली आहे.
3 / 12
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
4 / 12
कोरोना व्हायरस कुठून आला याचा शोध घेण्यासाठी WHO लवकरच आपली एक टीम चीनला पाठवणार आहे. पण या टीममध्ये कोण असेल याची माहिती सध्या जाहीर करण्यात आलेली नाही.
5 / 12
चीन आधीपासूनच कोरोना चीनमधून पसरला नसल्याचा दावा करत आहे. जगभरातून चीनवर टीका होत आहे. अशात दबावामुळे चीनने चौकशी टीमला परवानगी दिली असली तरी या चौकशीत चीन सरकारची पूर्ण मदत मिळते का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
6 / 12
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहनॉम यांनी कोरोनाच्या व्हायरसबाबत जेवढी अधिक माहिती मिळेल तेवढ्याच प्रभावीपणे त्याचा सामना करता येऊ शकतो असं म्हटलं आहे.
7 / 12
व्हायरसची निर्मिती नेमकी कशी झाली, याचा शोध घेणेही महत्त्वाचे आहे. आगामी काही दिवसांत जागतिक आरोग्य संघटनेचे पथक चौकशीसाठी चीनमध्ये जाणार असल्याचं सांगितलं.
8 / 12
जगभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा एकदा इशारा दिला आहे. अजून सर्वात वाईट स्थिती येणं बाकी असल्याचं म्हटलं आहे.
9 / 12
जगभरात योग्य पावले उचलली नाही तर हा व्हाररस आणखी लोकांना संक्रमित करू शकतो. काही दिवसांपूर्वीच WHO कडून जगभरातील नेत्यांना कोरोनावरून राजकारण न करण्याचा इशारा दिला होता.
10 / 12
टेड्रोस म्हणाले की, राष्ट्रीय एकतेत कमतरता, वैश्विक एकजुटतेत कमतरता आणि विभागलं गेलेलं जग कोरोना व्हायरसचा वेग वाढवत आहे. जर याला थांबवलं गेलं नाही तर आणखी वाईट स्थिती येणं बाकी आहे.
11 / 12
जागतिक आरोग्य संघटनेने जर्मनी, दक्षिण कोरिया आणि जपान सरकारांचं कौतुकही केलं. तसेच इतर देशांना या देशांच्या मार्गावर चालण्याचा आग्रह सुद्धा केला आहे.
12 / 12
कोरोना व्हायरस लवकरात लवकर नष्ट व्हावा. सर्वांनाच आपल्या सामान्य जगण्याकडे परत यायचंय. पण कटूसत्य हेच आहे की, आपण अजूनही ही महामारी संपण्यापासून खूप दूर आहोत असं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाDeathमृत्यूchinaचीन