शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : बापरे! मास्क न लावल्यास अटक होणार; 'या' देशाने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 8:31 AM

1 / 15
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे.
2 / 15
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही अमेरिकेतील रुग्णांची आहे. तर इटली, स्पेन, युरोपमधील परिस्थिती गंभीर निर्माण झाली आहे.
3 / 15
भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 48 लाख लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.
4 / 15
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ही वेगाने वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्याही एक लाखांहून अधिक झाली असून आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
5 / 15
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच देशांमध्ये खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोनाग्रस्तांवर रुग्णालयात योग्य उपचार केले जात असून अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
6 / 15
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं असून न लावल्यास दंड आकारण्यात आला आहे.
7 / 15
स्पेनमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या करोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. त्यानंतर आता स्पेनमध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश नागरिकांना देण्यात आले आहेत.
8 / 15
सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क न लावल्यास अटक करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पेनने हा कठोर निर्णय घेतला आहे.
9 / 15
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्पेनमध्ये काही नियम लागू करण्यात आले आहे. यामध्ये गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करताना मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे.
10 / 15
विशेषत: ज्या ठिकाणी दोन मीटरचे सोशल डिस्टेंसिंगचा नियमांचे पालन करणे कठीण आहे, त्या ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य आहे.
11 / 15
समुद्र किनारी बसण्यास मनाई करण्यात आली असून गर्दी कमी करण्यासाठी सोशल डिस्टेंसिंग व इतर पर्यायाचा अवलंब करण्यात येणार आहे.
12 / 15
स्पेनच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत नव्या आदेशांबाबत सविस्तर माहिती दिली जाईल. स्पेनमधील विविध क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर स्पेन सरकारने हा निर्णय घेतला आहे.
13 / 15
स्पेनमध्ये मागील काही दिवसांमध्ये मृतांच्या संख्येत घट झाली आहे. मागील दोन दिवसात मृतांची संख्या 100 पेक्षा कमी नोंदवण्यात आली आहे.
14 / 15
स्पेनमध्ये टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनच्या निर्बंधामध्ये शिथिलता आणली जात आहे. जवळपास दोन महिने घरातच राहणाऱ्या नागरिकांनी निर्बंधात शिथिलता आल्यानंतर घराबाहेर पडण्यास सुरुवात केली.
15 / 15
नागरिकांनी घराबाहेर पडण्यास सुरुवात केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूIndiaभारतAmericaअमेरिका