CoronaVirus News : आनंदाची बातमी! कोरोना व्हॅक्सीनची आशा वाढली; ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची टेस्ट पुढच्या स्टेजवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 09:59 PM2020-05-23T21:59:57+5:302020-05-23T22:22:49+5:30

कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी जगभरात व्हॅक्सीनवर संशोधन सुरू आहे. यातच, युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डच्या संशोधकांनी शुक्रवारी सांगितले, की कोरोना व्हायरसपासून बचावासाठी तयार करण्यात येत असलेल्या व्हॅक्सीनला सुरुवातीच्या स्टेजला यश आले आहे. आता आम्ही मानवावरील टेस्टिंगच्या दुसऱ्या लेवलला जात आहोत.

युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डच्या संशोधकांनी दुसऱ्या स्टेजच्या परीक्षणासाठी 10,000हून अधिक लोकांची भर्तीही सुरू केली आहे.

दुसऱ्या स्टेजसाठी 10,200 लोक - व्हॅक्सीन परीक्षणाची पहिली स्टेज गेल्या महिन्यात सुरू झाली होती. यात 55 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या 1,000 स्वस्थ लोकांवर आणि स्वयंसेवकांवर ट्रायल करण्यात आले होते...

...आता, त्यांच्या रोगप्रतिकार प्रणालीवर या व्हॅक्सीनचा काय परिणाम होतो, हे पाहण्यासाठी 70 वर्षांपेक्षा मोठे आणि 5 ते 12 वर्षांच्या मुलांसह 10,200हून अधिक लोकांची अध्ययनासाठी नोंदणी करण्यात येईल.

नुकत्याच झालेल्या एका अध्ययनात आढळून आले, की ChAdOx1 nCoV-19 नावाच्या वॅक्सीनला माकडावर केलेल्या टेस्टनंतर दिलासादायक यश आले आहे.

वॅक्सीनच्या परिणामांवर नजर - युनिव्हर्सिटीच्या जेनर इंस्टिट्यूटमधील व्हॅक्सीनोलॉजीच्या प्राध्यापक सारा गिलबर्ट म्हणाल्या, 'COVID-19 व्हॅक्सीन ट्रायल टीम ChAdOx1 nCoV-19ची सुरक्षितता आणि इम्युनोजेनिसिटी, तसेच व्हॅक्सीनच्या सामर्थाचा अभ्यास करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे.'

गिलबर्ट म्हणाल्या, आता आम्ही लस देणे सुरूच ठेवण्यासाठी वृद्ध लोकांना सहभागी करून घेऊ शकू. आम्ही देशातील वेगवेगळ्या भागांसोबतच अधिकच्या अध्ययन स्थळांचाही समावेश करणार आहोत.