Coronavirus: जाणून घ्या, भारतात कोरोनाचा संसर्ग कधी संपुष्टात येणार?; सिंगापूर युनिव्हर्सिटीचा मोठा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 12:20 PM2020-04-27T12:20:19+5:302020-04-27T12:25:13+5:30

भारतात २६ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ८०० हून अधिक लोकांचा जीव गेला आहे. ३ मे पर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. नेमका कोरोना संपणार कधी? भारतातून कोरोना हद्दपार कधी होणार? हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना आहे.

सिंगापूरमधील एका संस्थेने जगातील कोरोना विषाणूबद्दलच्या डेटाचे विश्लेषण केले आहे आणि कोरोना विषाणूचा कोणत्या देशात कधी संपुष्टात येईल हे सांगितले आहे.

सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी अँड डिझाइन (एसयूटीडी) च्या संशोधकांनी जगातील १३१ देशांमधील डेटा तपासला आहे, जिथे कोरोना विषाणू लोकांना सर्वाधिक त्रास होत आहे.

एसयूटीडीच्या संशोधकांनी सक्सेप्टिबल इन्फेक्टेड रिकवर्ड एपिडेमिक मॉडल (एसआयआर) च्या मदतीने याचे मूल्यांकन केले आहे. त्यांनी जगातील कोरोना रुग्णांचा आकडा वर्ल्ड इन डेटा वेबसाइटवरून घेतला आहे. २९ मे पर्यंत जगभरातील कोरोना विषाणूचा संसर्ग ९७ टक्के संपेल. परंतु १०० टक्के हा विषाणू संपुष्टात येण्यास ८ डिसेंबरपर्यंतचा कालावधी लागेल.

एसयूटीडी संशोधकांनी सध्या २८ देशांमधील कोरोना विषाणू संपुष्टात येणाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. या देशांमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, पाकिस्तान, जपान, कॅनडासह एकूण २८ देश आहेत. त्यामुळे कोणत्या देशात केव्हा कोरोना विषाणू संपुष्टात येईल हे जाणून घेऊया. इतर देशांची स्थिती जाणून घेण्यासाठी आपण एसयूटीडीच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.

एसयूटीडीनुसार कोरोना विषाणूचा संसर्ग सिंगापूरमध्ये ४ जून, सौदी अरेबियामध्ये २१ मे, अमेरिकेत ११ मे, इटलीमध्ये ७ मे, कतारमध्ये २६ जुलै आणि नायजेरियामध्ये १९ जून रोजी संपण्याची शक्यता आहे.

या अभ्यासानुसार, कोरोना विषाणूचा संसर्ग १९ मे रोजी रशियामध्ये, १० मे इराणमध्ये, १३ मे यूकेमध्ये, १ मे स्पेनमध्ये, ३ मे फ्रान्समध्ये आणि ३० एप्रिल जर्मनीत संपू शकतो.

कोरोना विषाणूचा संसर्ग ९ मे रोजी जपानमध्ये, कॅनडामध्ये १६ मे, तुर्कीमध्ये १५ मे, संयुक्त अरब अमिरातीमध्ये १५ मे, सुदानमध्ये ४ मे आणि इजिप्तमध्ये २० मे रोजी संपू शकतो.

सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी अँड डिझाइनच्या अभ्यासानुसार कोरोना विषाणूचा संसर्ग जॉर्डनमध्ये १९ एप्रिल रोजी, फिलीपिन्समध्ये ७ मे, इंडोनेशियात ३ जून, मलेशियामध्ये ५ मे, पाकिस्तानमधील ३ जून, बहरीनमध्ये ३ जून आणि कुवेतमध्ये २९ मे रोजी संपणार आहे.

या अभ्यासानुसार या दोन देशांमध्ये कोरोना विषाणूची लागण संपुष्टात आली आहे. २२ एप्रिल रोजी लेबनॉन आणि १३ एप्रिल रोजी ऑस्ट्रेलियामध्ये. तथापि, आकडेवारीच्या आधारे केलेल्या या अभ्यासात असे सांगितले गेले आहे की अभ्यासाचे आकडे बदलू लागल्याने तारीख बदलू शकेल.

सिंगापूर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड डिझाइनच्या अभ्यासानुसार, भारतातील कोरोना विषाणूचा संसर्ग २१ मे पर्यंत संपू शकेल. २१ मे पर्यंत हे प्रमाण ९७ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

या अभ्यासानुसार १८ जून २०२० पर्यंत भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग पूर्णपणे नष्ट होऊ शकतो. तथापि, देशातील बर्‍याच तज्ञांच्या मते, लोकांनी लॉकडाऊनचे तंतोतंत पालन केले तर भारतातील कोरोना विषाणूची दुसरी स्टेज थांबू शकते.

एसयूटीडीच्या अभ्यासानुसार, २४-२५ एप्रिल २०२० पर्यंत दररोज भारतात येत असलेल्या कोरोना प्रकरणांमध्ये सतत घट होईल. २१ मे, २०२० च्या आसपास ९७ टक्के कोरोना संसर्गात घट होईल. पण दररोज बदलणार्‍या आकडेवारीनुसार या आकड्यातही बदल होऊ शकतात.