CoronaVirus : सुल्तानचे कठोर नियम, कोरोनामुळे फक्त एका व्यक्तीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 09:26 AM2020-04-13T09:26:14+5:302020-04-13T09:45:20+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण जगात पसरला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जगभरातील देशांनी विविध उपाययोजना आखल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणात असलेल्या देशांमध्ये लॉकडाऊन आणि आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. काही देशांनी तर कडक नियम लागू केले आहेत. यामध्ये ब्रुनेई या देशाचा समावेश आहे.

ब्रुनेई दक्षिण-पूर्व आशियाचा एक छोटासा इस्लामिक देश आहे. या देशात १३६ लोकांना कोरोनाची बाधा झाली. मात्र, या आजारातून १०४ रुग्ण बरे झाले, तर एकाचा मृत्यू झाला.

ब्रुनेई जगभरातील अशा देशांपैकी एक आहे, ज्यामध्ये अद्यापही राजेशाही आहे. जसे की उत्तर कोरिया. ब्रुनेईच्या सुल्तानाचे नाव हसनअल बोल्किया आहे. याठिकाणी सुल्तानजवळ संपूर्ण देशाची सत्ता आहे.

एक व्यक्ती मलेशियाहून प्रवास करून ब्रुनेईला आला होता. तो ब्रुनेईचा पहिला नागरिक कोरोनाग्रस्त होता. ज्यावेळी ब्रुनेईत हा पहिला रुग्ण आढळला, त्यावेळी सुल्तानने याठिकाणी कडक नियम लागू केले.

२४ मार्च २०२० पासून ब्रुनेईत नागरिकांच्या विदेश आणि देशांतर्गत विमान प्रवासावर बंदी घालण्यात आली. तसेच, जे नागरिक विदेशातून आले आहेत, त्यांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन केले. लग्न, खेळ, सामूहिक बैठका यावर बंदी घातली. मशिदीमध्येही जाण्यास मनाई करण्यात आली.

देशाच्या सुल्तानने कोरोना व्हायरस टेस्टची क्षमता १० टक्क्यांनी वाढविली. मलेशियाच्या 'द स्टार न्यूज' या वृत्तपत्रानुसार, २२ मार्चला सुल्तानने सांगितले होते की, "आरोग्य मंत्रालय वैद्यकीय कर्मचाऱ्यांची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. यासोबत टेस्टिंगची क्षमता सुद्धा वाढेल. टेस्टिंगची क्षमता १० टक्क्यांनी वाढविण्यासाठी virology laboratory तयारी सुरु आहे."

सुल्तानने ब्रुनेईतील लोकांना सांगितले की, कोरोनामुळे कोणतीही प्रकारची काळजी घेताना घाबरून जाऊ नका. तांदूळ आणि साखर यासारखे आवश्यक साहित्य सरकारजवळ उपलब्ध आहे.

ब्रुनेईमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही आहे. येथील सुल्तानचे शासन असे आहे की, मीडिया त्यांच्याविरोधात कोणतीही प्रकारची माहिती देऊ शकत नाही. सुल्तानचे नियम कडक आहेत. नियमांचे उल्लंघन केल्या शिक्षा दिली जाते. ब्रुनेईचे सुल्तान हसनअल बोल्किया हे जगातील सर्वात जास्तकाळ शासन करणारे आहेत. ऑगस्ट १९६८ मध्ये हसनअल बोल्किया यांचे वडील सर हाजी उमर अली सैफुद्दीन यांच्यानंतर त्यांच्याकडे देशाची सत्ता आली आहे.

सुल्तान हसनअल बोल्किया हे जगातील श्रीमंत व्यक्तीपैंकी एक आहेत. देशात इस्लामिक 'शरिया कायदा ' (Sharia law) लागू केल्याप्रकरणी त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता. .......(सर्व फोटो फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून घेण्यात आले आहे.)