By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 15:23 IST
1 / 8इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे 'होरमुझची सामुद्रधुनी' बंद झाली असून, याचा थेट फटका आशियाई देशांना बसला आहे. कच्च्या तेलाचा आणि गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक देशांनी २०२० मधील 'कोविड' लॉकडाऊनसारखे कडक नियम लागू केले आहेत. आशियातील ७०-८०% तेल आयात याच मार्गावरून होत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.2 / 8राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी घोषित राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनिअर यांनी देशात 'नॅशनल एनर्जी इमर्जन्सी' लागू केली आहे. इंधन आणि औषधांचा साठा करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली असून, साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.3 / 8कोरियामध्ये सरकारने नागरिकांना 'कोविड' काळाप्रमाणे सावध राहण्याचे आवाहन केले आहे. शावर घेण्याचा वेळ कमी करणे, रात्रीच्या वेळी इलेक्ट्रिक गाड्या चार्ज न करणे आणि कमी अंतरासाठी सायकल वापरणे यासारखे १२ नियम पाळणे सक्तीचे केले आहे.4 / 8श्रीलंका: इंधन बचतीसाठी दर बुधवारी सुट्टी जाहीर करण्यात आली असून '४-डे वर्क वीक' लागू केला आहे. यामुळे २५% इंधन वाचवण्याचे लक्ष्य आहे.5 / 8पाकिस्तान: शाळा २ आठवड्यांसाठी बंद ठेवण्यात आल्या असून ५०% कर्मचाऱ्यांसाठी 'वर्क फ्रॉम होम' अनिवार्य केले आहे.6 / 8थायलंड: सरकारी कार्यालयात एसीचे तापमान २६-२७ डिग्री ठेवण्याचे आणि लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करण्याचे निर्देश दिले आहेत.7 / 8व्हिएतनाम: जेट फ्यूलच्या टंचाईमुळे 'व्हिएतनाम एअरलाईन्स'ने ७ देशांतर्गत मार्गावरील २३ विमान फेऱ्या रद्द केल्या आहेत.8 / 8भारतातही अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून सरकार आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यायी मार्गांचा विचार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत कोरोनासारखी परिस्थिती उद्भवू शकते, असा इशारा दिला आहे.